ग्रॅंड स्लॅम मंडळाचा निर्णय रद्द 

लंडन – जागतिक टेनिस संघटनेतील ग्रॅंड स्लॅम मंडळाने चार मुख्य ग्रॅंड स्लॅम स्पर्धांमध्ये मानांकन देण्यात येणाऱ्या खेळाडूंची संख्या निम्म्यावर आणण्याचा निर्णय घेतल्याने खळबळ उडाली होती. परंतु चारही ग्रॅंड स्लॅम स्पर्धांचे आयोजन करणाऱ्या संघटनांच्या समन्वय समितीने आता आगामी चारही मुख्य स्पर्धांमध्ये पुरुष आणि महिला गटात पूर्वीप्रमाणेच 32 खेळाडूंना मानांकन देण्याचा निर्णय घेतला आहे.

ग्रॅंड स्लॅम मंडळाने यापूर्वी सांगितले होते की, आगामी ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन आणि अमेरिकन ओपन या मुख्य ग्रॅंड स्लॅम स्पर्धांमध्ये पुरुष व महिाल एकेरीत केवळ 16 खेळाडूंना मानांकन देण्याचा आदेश दिला होता. परंतु या चारही ग्रॅंड स्लॅमच्या समन्वय समितीने हा निर्णय बदलला असून पुढील वर्षी- 2019 मध्ये होणाऱ्या या प्रमुख चार स्पर्धांमध्ये पूर्वीप्रमाणेच 32 खेळाडूंना मानांकन देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

चालू वर्षातील सर्व ग्रॅंड स्लॅम स्पर्धांचे विश्‍लेषण केल्यानंतर, तसेच खेळाडू आणि स्पर्धांचे प्रक्षेपण करणारे भागीदार व प्रायोजक यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर आम्ही मानांकित खेळाडूंचे प्रमाण अर्ध्याने कमी करण्याचा प्रस्ताव रद्द करण्याचा निर्णय घेतला, असे ग्रॅंड स्लॅम मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पुरुष व महिला गटांत 32 खेळाडूंना मानांकन देण्याचा निर्णय 2001 पासून अंमलात आला होता. त्यानंतर अव्वल खेळाडूंचा अंतिम फेरीपर्यंतचा मार्ग अधिक खडतर करण्यासाठी केवळ 16 खेळाडूंना मानांकन देण्याचा नवा प्रस्ताव देण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)