ग्रीन फाऊंडेशन 50 हजार झाडे लावणार

लोणी काळभोर – ग्रीन फाऊंडेशन व वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तीर्थक्षेत्र रामदरा परिसरात आगामी तीन वर्षांत लोकसहभागातून 50 हजार झाडे लावून संपूर्ण परिसर हिरवागार करण्यात येणार असल्याचे फाऊंडेशनचे अध्यक्ष अमित जगताप यांनी सांगितले.
ग्रीन फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी तीर्थक्षेत्र रामदरा-वडकी रस्त्यालगत एक हजार झाडे लावली आहेत. याप्रसंगी अमित जगताप यांनी ही माहिती दिली. जगताप पुढे म्हणाले की, प्रत्येकाने वृक्षलागवड करुन झाडे जगवणे काळाची गरज आहे. वृक्ष नसतील तर कमी पर्जन्यमाना बरोबरच इतरही अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. या वेळी दिग्विजय काळभोर, मयूर काळभोर, धनश्री म्हस्के, विनोद राहिंज, महेश खुळपे, दिगंबर जोगदंड, राहुल कुंभार, किरण भोसले, अमित कुंभार, मयूर तावरे, विक्रम पवार, साहिल मुलानी, सुरज भोकाडे, अक्षय शिंदे आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन राहुल कुंभार यांनी तर उपस्थितांचे आभार किरण भोसले यांनी मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)