ग्रीन फटाके म्हणजे काय रे भाऊ?

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव. जागोजागी दिव्यांची आणि फुलांची आरास. रंगबेरंगी फटाक्यांचा प्रकाशात आणि आवाजात दिवाळीची संध्याकाळ सजते. लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत सर्वच जण फटाके उडवून आपला आनंद साजरा करतात. परंतु, यावर्षी सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांवर घातलेल्या बंदीमुळे अनेकांच्या आनंदावर विर्जन पडण्याची शक्यता आहे. यामध्ये न्यायालयाने ग्रीन फटाके वाजवण्याची मुभा जरी दिली असली तरी ग्रीन फटाके म्हणजे काय हा प्रश्न सर्वानाच पडलेला आहे. फटाके विक्रेत्यांनाही या प्रश्नाचे उत्तर मिळालेले नाही. त्यामुळे हे ग्रीन फटाके कुठे उपलब्ध होणार हा तर फार मोठा ग्रहण प्रश्नच आहे. परंतु, या सर्व प्रश्नांवर उत्तर शोधाण्यासाठी देशभरातील वैज्ञानिकांनी मिळून पुढाकार घेतला आहे. त्यांनी ग्रीन फटाके शोधूनही काढले आहेत.

माणूस साधारणपणे ६० डेसिबलपर्यंत आवाज सहन करू शकतात. परंतु सामान्य फटक्यांचा आवाज हा ८० डेसिबल असतो. तसेच सामान्य फटाक्यांपासून निर्माण होणाऱ्या वायूचे प्रमाणही जास्त असते. मात्र वैज्ञानिकांनी तयार केलेले ग्रीन फटाके म्हणजेच हरित फटाक्यांचा आवाज ६० डेसिबलपेक्षा कमी असतो. तर यामधून निर्माण होणाऱ्या धुराचे प्रमाणही ३०-४० टक्क्यांनी कमी असते. असे असले तरीही ग्रीन फटाकेही आपल्याला सामान्य फटाक्यांसारखाच लाईट आणि साउंडचा अनुभव देतात. ग्रीन फटाक्यांमधील विविध घटकांना हटवून कमी धोकादायक तत्वांचा वापर करण्यात आला आहे. शिवाय सल्फर डायआॅक्साईडचे उत्सर्जन न करतादेखील फटाके तयार करण्याचा वैज्ञानिक प्रयत्न करत आहेत. या ग्रीन फटाक्यांना  स्वास  (सेफ वॉटर रिलिजर), सफल (सेफ मिनिमल अ‍ॅल्युमिनियम), ‘स्टार’ (सेफ थर्माईट क्रॅकर्स) अशी नावेही देण्यात आली आहेत. परंतु, हे ग्रीन फटाके अद्यापही प्रायोगिक स्थित आहेत. त्यामुळे बाजारात उपलब्ध झालेले नाहीत. पुढील वर्षापर्यंत ग्रीन फटाके बाजारात उपलब्ध होतील अशी आशा आहे.

ग्रीन फटाके जरी बाजारात आले नसले तरी अशा स्थितीत बाजारात इ-फटाके उपलब्ध झाले आहेत. इ-फटाक्यांमधून आवाज आणि लाईट तर निर्माण होती परंतु प्रदूषण होत नाही. त्यामुळे हे पूर्णपणे इकोफ्रेंडली असल्याचा दावा करण्यात येत आहे. तर हे आता कसे हा प्रश्न पडणे साहजिक आहे. इ-फटाके केवळ इलेक्ट्रीसिटीनेच जळाता येऊ शकतात. या फटाक्यांना इलेक्ट्रिक प्लग रिमोटनेच संचालित करता येऊ शकतात. त्यामुळे यामधून केवळ फटाक्यांसारखा आवाज आणि लाईट निर्माण होते. तर धूर निर्माण होत नाही. इ-फटाक्यांचा आवाजही न्यायालयाने निर्देशित केलेल्या मानकांमध्ये बसतो. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत फटाके वाजवण्याची तुमची इच्छा इ-फटाके पूर्ण करू शकतात.

यंदाच्या दिवाळीत पूर्णपणे इकोफ्रेंडली साजरा करण्याचा निश्चय करा.

– श्वेता शिगवण 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)