ग्रीन झोन ऍग्रोच्या चित्रकला स्पर्धेत कोथळेचा हर्षद भोसले प्रथम

जेजुरी – ग्रीन झोन ऍग्रोच्या वतीने बसवंत या द्राक्ष प्रदर्शनानिमित्त बालगंधर्व कलादालन पुणे येथे भरविण्यात आलेल्या चित्रकला प्रदर्शनात कोथळे येथील विद्या महामंडळ प्रशालेच्या हर्षद कैलास भोसले या विधार्थ्याने प्रथम क्रमांक पटकाविला.
बालगंधर्व कलादालन पुणे येथे जिल्हा पातळीवर चित्रकला स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. 5 वी ते 7 वीच्या गटात हर्षद भोसले याने स्ट्रॉबेरीचे आकर्षक चित्र काढून सहभाग घेतला होता. या गटात त्याने प्रथम क्रमांक पटकाविला. सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक व रोख तीन हजार रुपये बक्षीस देऊन त्याचा सन्मान करण्यात आला. सुहास कदम, विजय नाईकरे, सचिन पवार, गोरख भोर, चंद्रकांत चौधरी, अनिल ताकवणे आदी यावेळी उपस्थित होते. कोथळे येथील विद्या महामंडळ प्रशालेचे मुख्याध्यापक एच. डी. दरेकर, पुणे जिल्हा कला शिक्षक संघाचे उपाध्यक्ष अशोक साबळे यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्याला लाभले. या यशाबद्दल हर्षद भोसले याचा विद्यालयात सन्मान करण्यात आला. श्री मल्हार शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)