ग्रीन अॅपल बाजारात दाखल

पिंपरी – फळांचे दर वाढलेले असले तरी आजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या आणि आरोग्याच्या दृष्टीकोनातून महत्त्वाच्या असणाऱ्या फळांना बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असते. परदेशी फळांच्या यादीत असणाऱ्या ड्रॅगन फ्रूट आणि किवी पाठोपाठ “ग्रीन अॅपल’ची आवक बाजारात झाली आहे. ग्रीन ऍपल मधुमेहावर गुणकारी मानले जात असल्याने त्याला मोठीमागणी आहे.

कोणत्याही फळाचे सेवन केल्याने शरिराला त्याचा उपयोग होतोच. त्यामुळे डॉक्‍टर आजारी असणाऱ्यांना त्याच्या आजारानुसार त्याला फळे खायला सांगता. दिवसाला एक सफरचंद निरोगी आरोग्यासाठी महत्त्वाचे मानले जाते. ग्रीन ऍपल चवीला आंबट गोड आहे. त्याचा रंग बाहेरून फिक्कट हिरवा असून त्याच्या आतमध्ये पांढरा रंग असतो. विविध जीवनसत्त्वाने समृद्ध असलेल्या या फळाची आवक दक्षिण अफ्रीका आणि न्यूझीलंड वरून होते.

पिंपरीच्या फळ बाजारात दाखल झालेला ग्रीन ऍपल 300 रूपये किलोने विकला जात आहे. यामध्ये सर्वात जास्त क जीवनसत्त्व असते. त्यापाठोपाठ यामध्ये प्रथीने, लोह आणि फायबर असते. बारा ही महिने हे फळ मिळते. मधुमेह, रक्तदाब आणि कोलॅस्टोरल कमी करण्यास हे फळ मदत करते. त्यामुळे ज्या नागरिकांना या फळाविषयी माहिती आहे, ते नागरीक या फळांची मागणी करत असल्याचे फळ विक्रेता कुमार शिरसाठ यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)