ग्राहक हाच राजा! (भाग-२)

ग्राहक संरक्षण विधेयक – 2018 लोकसभेत मंजूर करण्यात आले असून, त्यामुळे ग्राहकांचे हितरक्षण आणि त्याच्याशी संबंधित विवादांचा निपटारा लवकरात लवकर होणे शक्‍य झाले आहे. 1986 मध्ये तयार केलेला ग्राहक संरक्षण कायदा आजच्या काळात प्रभावी ठरत नव्हता. त्यामुळे नव्या कायद्याची गरज होतीच. कायदा सक्षम असला, तरी अंमलबजावणीची प्रभावी यंत्रणा उभी करणे हे यापुढील आव्हान असणार आहे.

ग्राहक हाच राजा! (भाग-१)

एका सर्वेक्षणानुसार, सध्या देशभरात बनावट ग्राहकोपयोगी वस्तूंची बाजारपेठ तब्बल 2500 कोटी रुपयांच्या वर आहे. सध्या अस्तित्वात असलेला कायदा 1986 मध्ये लागू करण्यात आला होता. हा कायदा लागू करतेवेळी ग्राहकांना शोषणापासून मुक्‍त करणे आणि ग्राहकांच्या हितांचे संरक्षण करणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते; परंतु हा कायदा लागू होऊन तीस वर्षे उलटून गेल्यानंतर आजही ग्राहकांचे हितरक्षण करण्यास हा कायदा पुरेसा पडत नाही, असे दिसून आले आहे. या कायद्यामुळे जो अपेक्षित परिणाम बाजारपेठेवर दिसायला हवा होता, तसा तो दिसत नाही. अर्थात, या कायद्यानुसार, ग्राहकांना न्याय मिळण्यासाठी त्रिस्तरीय अर्धन्यायिक रचना करण्यात आली असून, परंपरागत न्यायालयांमध्ये येणारे ग्राहकांशी संबंधित खटले जिल्हा मंच, राज्य आयोग आणि केंद्रीय आयोगाकडे दाखल व्हावेत आणि त्यांचा निपटारा लवकरात लवकर व्हावा, ही अपेक्षा होती. परंतु असे काहीही घडू शकलेले नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ग्राहक मंचाने अनेक वेळा ग्राहकांच्या हिताच्या रक्षणाच्या दृष्टीने निवाडा केला आहे; परंतु प्रलंबित खटल्यांची संख्या पाहता, नव्या कायद्यानुसार तरी ग्राहकांना वेळेवर न्याय मिळणार का, असा प्रश्‍न उपस्थित होतो. न्यायदानास झालेला विलंब हा अन्यायच असतो, या उक्‍तीनुसार, आता नवा कायदा प्रभावीपणे राबविण्यासाठी अंमलबजावणीची यंत्रणा उभारायला हवी. बाजारपेठेत झालेली वाढ आणि बदल लक्षात घेता ही यंत्रणा पुरेशी ठरायला हवी. अन्यथा कायदा सक्षम असूनही न्याय मिळणे दूरच राहील. नव्या कायद्याने ग्राहक हाच बाजारपेठेचा राजा असल्याचे अधोरेखित केले आहे. अंमलबजावणीच्या पातळीवर ते दृष्टीस पडायला हवे, इतकेच!

– सूर्यकांत पाठक, कार्याध्यक्ष, अ.भा. ग्राहक पंचायत


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)