ग्राहक हाच राजा! (भाग-१)

ग्राहक संरक्षण विधेयक – 2018 लोकसभेत मंजूर करण्यात आले असून, त्यामुळे ग्राहकांचे हितरक्षण आणि त्याच्याशी संबंधित विवादांचा निपटारा लवकरात लवकर होणे शक्‍य झाले आहे. 1986 मध्ये तयार केलेला ग्राहक संरक्षण कायदा आजच्या काळात प्रभावी ठरत नव्हता. त्यामुळे नव्या कायद्याची गरज होतीच. कायदा सक्षम असला, तरी अंमलबजावणीची प्रभावी यंत्रणा उभी करणे हे यापुढील आव्हान असणार आहे.

ग्राहक संरक्षण कायदा 1986 मध्येच तयार करण्यात आला होता. परंतु तेव्हापासून आतापर्यंत बाजाराच्या परिस्थितीत प्रचंड बदल घडून आले आहेत. आजच्या परिस्थितीत जुना कायदा फारसा प्रभावी ठरत नसल्याचे समोर आले आहे. ग्राहकांचे हितरक्षण करण्यास हा कायदा पुरेसा पडत नव्हता. नव्या विधेयकाचा सर्वांत महत्त्वाचा फायदा म्हणजे, पूर्वीच्या कायद्यानुसार ज्या ठिकाणी वस्तू खरेदी केली, त्या ठिकाणी जाऊन तक्रार नोंदविणे ग्राहकाला बंधनकारक होते; परंतु आता ग्राहक घरबसल्याही तक्रार नोंदवू शकेल. याखेरीज विधेयकात मध्यस्थीचीही तरतूद करण्यात आली आहे. नव्या विधेयकात अशी तरतूद आहे की, जिल्हा आणि राज्य ग्राहक मंचाने जर ग्राहकाच्या बाजूने निकाल दिला, तर आरोपी कंपनी राष्ट्रीय मंचाकडे धाव घेऊ शकत नाही. आधी ग्राहकाला ज्या ठिकाणाहून वस्तू विकत घेतली तिथेच तक्रार नोंदवावी लागत होती; परंतु आता घरात बसूनही तो तक्रार नोंदवू शकेल.

ग्राहक हाच राजा! (भाग-२)

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नव्या विधेयकात आणखी एक मूलभूत गोष्ट अशी आहे की, स्थायी समितीने भ्रामक जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींना तुरुंगवासाच्या शिक्षेची शिफारस केली होती. मात्र, विधेयकात केवळ दंडाची तरतूद करण्यात आली आहे. ग्राहक संरक्षण दुरुस्ती विधेयक संसदेत मंजूर होताच ग्राहकांसाठी एक हितावह नवयुग सुरू होण्याची निश्‍चिती झाली आहे. आता नवा कायदा अस्तित्वात आला असतानाच पूर्वीच्या प्रलंबित प्रकरणांकडेही लक्ष द्यायला हवे. राष्ट्रीय ग्राहक आयोगात एकंदर 20 हजार प्रकरणे प्रलंबित असून, वेगवेगळ्या राज्यांच्या ग्राहक आयोगाकडे प्रलंबित असणाऱ्या प्रकरणांची संख्या लाखाच्या घरात आहे. आता नव्या कायद्यामुळे ग्राहकाला तक्रार करण्याच्या बाबतीत मोठी सवलत मिळाली असताना अशा प्रकरणांचा तेजीने निपटारा होण्याची व्यवस्थाही उभी करायला हवी. अन्यथा कायदा सक्षम असला, तरी केवळ तक्रारींचा ढिगाराच वाढत जाईल आणि ग्राहकांमधील असंतोष कायमच राहील.

– सूर्यकांत पाठक, कार्याध्यक्ष, अ.भा. ग्राहक पंचायत


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)