पुणे – सदाशिव पेठेतील ग्राहक पेठेतून 2 लाख 29 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याप्रकरणी खडक पोलिसांनी एकाला अटक केली. न्यायालयाने त्याला 4 जूनपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश दिला आहे.
दिपक कृष्णा कुटूम (वय 24, रा. पुणे स्टेशन फुटपाथ, मुळ. आसाम) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. याबाबात उदय मोरेश्‍वर जोशी (वय 42) यांनी फिर्याद दिली आहे. 23 ते 24 मे दरम्यान ही घटना घडली.
घटनेच्या दिवशी आरोपीने सदाशिव पेठ येथील ग्राहक पेठेत ग्रॉसरी विभागाच्या पाठीमागील दारातून प्रवेश केला. 2 लाख 29 हजारांचा ऐवज लांबविला होता. 30 हजार 400 रुपये रोख, 1 लाख 95 हजार रूपये किंमतीची सोन्याची नाणी, 2 हजार 100 रुपयांची चांदीची नाणी आणि अन्य साहित्य लांबविले होते. या प्रकरणी कुटूम याला अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यावेळी त्याचे इतर कोणी साथीदार आहे का?, अशा स्वरूपाच्या त्याने इतर ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत का?, याचा शोध घेण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकिलांनी केली. त्यानुसार न्यायालयाने कुटूम पोलीस कोठडी सुनाविली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)