ग्राहक पंचायत महाराष्ट्र शिरूर तालुका अध्यक्षपदी सतीश ढमढेरे

तळेगाव ढमढेरे- येथील सतीश विश्वनाथ ढमढेरे यांची नुकतीच ग्राहक पंचायत महाराष्ट्र शिरूर तालुका अध्यक्षपदी म्हणून निवड झाली आहे. समाजातील कार्याची तळमळ तसेच ग्राहक पंचायतीच्या विविध कार्यामध्ये असणारा सहभाग या सर्व गोष्टींची दखल घेऊन त्यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे राज्यस्तरीय दोन दिवसीय अभ्यास वर्गामध्ये राज्याचे अध्यक्ष डॉ. विजय लाड यांच्या असते सन्मान प्राप्त झाला. ग्राहक तीर्थ बिंदुमाधव जोशी संस्थापक अध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांचे स्वप्न ग्राहकाला न्याय पीडितांचे शोषण थांबले पाहिजे. ग्राहकाला त्याचे हक्क मिळवून देण्यासाठी शिरूर तालुक्‍यातील प्रत्येक गावामध्ये ग्राहक पंचायतीचे कार्य पोहोचवण्यात प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. प्रशासन आणि ग्राहक यांचा दुवा म्हणून निस्वार्थीपणे काम करणार आहे. ग्राहकांचे हक्क ग्राहक कायदा यांची माहिती तळागाळात पोहोचवण्याचे पवित्र काम करण्याचा प्रयत्न करणार आहे, असे सतीश ढमढेरे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)