ग्राहक पंचायतीकडून गृहिणींच्या कल्पतेला वाव

गौरी सजावट स्पर्धेतील विजेत्या महिलांचा सन्मान करताना मान्यवर. (छाया : धनंजय घोडके)

एन. ए. कुलकर्णी : गौरी सजावट स्पर्धेचे पारितोषिक वितरण
वाई, 10 (प्रतिनिधी) – अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा वाईने गौरी सजावटीत सामाजिक संदेश देणारे निकष ठेवल्यामुळे जनजागृतीबरोबरच गृहिणींच्या अंगी असलेल्या कल्पकतेला वाव दिला आहे, असे प्रतिपादन मध्य महाराष्ट्र प्रांत सदस्य एन. एस. कुलकर्णी यांनी केले. वाई ग्राहक पंचायतीच्यावतीने आयोजित गौरी सजावट स्पर्धेच्या पारितोषिक वितणर सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी अध्यक्ष ग्राहक पंचायत साताराचे दिलीप पाटील, कार्यक्रमाच्या अध्यक्षा नगराध्यक्षा डॉ. प्रतिभाताई शिंदे, प्रातपगड उत्सव समितीच्या निमंत्रक विजयाताई भोसले, नगसेविका रूपाली वनारसे वासंती ढेकाणे, शितल शिंदे, प्रियांका डोंगरे, विजय ढेकाणे, भाजप तालुकाध्यक्ष सचिन घाटग,े यशवंत लेले, किरण खामकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी एन. ए. कुलकर्णी यांनी ग्राहकाची फसवणूक कशी टाळावी या विषयी मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष दिलीप पाटील यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले तर नगराध्यक्षा डॉ. प्रतिभाताई शिंदे यांनी ग्राहक पंचायत वाईच्या कार्याचे कौतुक केले.
रेखा सुनिल पवार यांच्या केरळचा जलप्रलय या विषयी केलेल्या सजावटीस या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला. व्दितीय क्रमांक प्रदीप बळीप यांच्या वाडा संस्कृती या सजावटीस, तृतीय क्रमांक विणा नारायण जाधव यांच्या ग्रामीण संस्कृती सजावटीस तर चतुर्थ क्रमांक गोपीमुक्ता टुर्स ऍण्ड टॅव्हर्ल्स यांच्या कृष्णलिला या अध्यात्मिक सजावटीस मिळाला. तसेच पाचवा क्रमांक दिपाली महामुनी यांच्या कोकण संस्कृती या कल्पक सजावटीस प्राप्त झाला. त्याचबरोबर विशेष प्राविण्यामध्ये 4 व उत्तेजनार्थ 5 पारितोषिके देण्यात आली. तसेच प्रत्येक स्पर्धकास सहभाग प्रमाणपत्र व ग्राहक पंचायत मार्गदर्शक पुस्तिका व जागो ग्राहक पत्रक देण्यात आले.
किशोर फुले पाहुण्यांचे स्वागत केले. प्रस्तावना बाळासाहेब कोलार तर सूत्रसंचालन वाई तालुका संघटक विजेंद्र शिंदे यांनी केले. पाहुण्यांच्या परिचय वाई तालुका उपाध्यक्ष सतीश जेबले यांनी केला. शुभदा नागपूरकर, विश्वनाथ वायदंडे यांनी आभार मानले. स्पर्धेत यादी वाचन स्मिता भोज, रोहिणी पवार, अपर्णा गायकवाड सुर्यकांत अंबेकर रविंद्र माने यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल जायगुडे, श्रीमंत होनराव, अनिल भोज यांनी परिश्रम घेतले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)