ग्राहक पंचायतचा महावितरण विरोधात आंदोलनाचा इशारा

शिक्रापूर- अखिल भारतीय ग्राहक पंचायत कार्यालय शिक्रापूर येथे नुकतीच मासिक बैठक पार पडली. यावेळी उपस्थित असलेल्या विविध गावच्या कार्यकर्त्यांनी महावितरणबाबत विविध तक्रारी मांडल्या. त्यानंतर अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने महावितरण कार्यालय येथे भेट देत ग्राहकांच्या समस्या सोडविण्याची विनंती करण्यात आली आहे. ग्राहकांच्या समस्या न सोडविल्यास आंदोललाचा इशारा अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे तालुकाध्यक्ष सुनील हिंगे यांनी दिला आहे. नागरिकांनी त्यांच्या तक्रारी लेखी स्वरुपात करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शिक्रापूर (ता. शिरूर)सह परिसरातील अनेक गावांतील ग्राहकांच्या विजेबाबतच्या समस्या वाढल्या असून महावितरण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी याकडे लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महावितरण विभागाने याकडे लक्ष देत ग्राहकांच्या अडचणी सोडवाव्यात. अन्यथा, अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे पुणे जिल्हाध्यक्ष रमेश टाकळकर, प्रवाशी महासंघाचे प्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. त्यांनतर महावितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे शिरूर तालुकाध्यक्ष सुनील हिंगे, संघटक दिलीप बेंद्रे, सचिव देवेंद्र सासवडे, ऊर्जा समितीप्रमुख राहुल दिघे यांसह आदी मान्यवर, ग्राहक पंचायतचे कार्यकर्ते उपस्थित होते. तर यावेळी महावितरण विभागाने ग्राहकांच्या समस्या लवकरात लवकर न सोडविल्यास आंदोलन करण्यात येणार असल्याबाबतचे निवेदन महावितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन यांना देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)