ग्राहक दिनी तक्रारींचा पाऊस, गैरहजर अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसा

अकोले – तहसीलदार यांच्या दालनात झालेल्या ग्राहक दिनी अकोले तालुक्‍यातील अनेकांनी ग्राहक हक्‍क म्हणून भेडसावणाऱ्या समस्या लेखी व तोंडी स्वरूपात तहसीलदार मुकेश कांबळे यांच्या समोर मांडल्या. त्यात गॅस विषयक तक्रारी जास्त होत्या. तर जे अधिकारी ग्राहक दिनास गैरहजर होते, त्यांना कारणे दाखवा नोटीसा काढण्यात येणार असल्याचे तहसीलदार यांनी स्पष्ट केले.
तहसीलदार मुकेश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्राहक दिनाच्या बैठकीत तसेच प्रत्येक ग्राहक दिनी गॅस टाकी संबंधित अनेक तक्रारी असतात. गॅसधारकाला वेळेवर गॅस मिळत नाही, रास्त भावात व घरपोहोच टाकी तालुक्‍यात बहुतेक ठिकाणी मिळत नाही. त्याचबरोबर ग्राहकाला पैसे दिल्याची पावती मिळत नाहीत, अशा अनेक तक्रारी मांडतांनाच डी.जे.चा आवाज आणि त्याचे होणारे दुष्परिणाम याबद्दल ग्राहकांनी जोरदार आवाज उठविला. बसस्थानकातील अस्वच्छता, तेथे सुरू असणारे अवैध व्यवसाय, राजूरमधील अवैध दारू विक्री, अकोले तालुक्‍यातील अवैध गुटखा विक्री, वीज वितरण कंपनीचा गलथान कारभार, नगरपंचायतीचे स्वच्छता अभियान व अग्निशामक गाडी, भूमि अभिलेखचा रटाळ कारभार, आधार नोंदणी केंद्र वाढविण्याबाबत ग्राहकांचा आग्रह, तसेच तालुक्‍यातील 1 ते 20 पटसंख्या असलेल्या 19 शाळा बंद करू नये, आश्रम शाळेतील मुलांना चांगले भोजन दिले जात नसल्याच्याही तक्रारी अनेकांनी मांडल्या.
यावेळी ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक, डॉ. किरण लहामटे, ऍड. भाऊसाहेब वाळुंज, रमेश राक्षे, नरेंद्र देशमुख, राम रूद्रे, प्रा. डॉ.सुनिल शिंदे, संजय वाकचौरे, माधवराव तिटमे, राजेंद्र घायवट, ऍड. दीपक शेटे, नगरसेवक प्रमोद मंडलिक, सुदाम मंडलिक, मंगलताई मालुंजकर, किरण चौधरी, विजय पोखरकर, भाऊसाहेब वाकचौरे, सुरेश गायकवाड, सुरेश पवार, रामदास पवार, रामदास पांडे, शुभम खर्डे, सखाहारी पांडे, नवनाथ आवारी, नंदू गायकवाड, रामदास साबळे, राम भांगरे (सर), सुनील देशमुख, केशव कोल्हाळ, शांताराम कोकणे (तात्या), तसेच नायब तहसिलदार भाऊराव भांगरे, डी. एन. काकडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता विष्णू कळंबे, भूमि अभिलेखचे एस. पी. सावंत, जि. प. सार्वजनिक बांधकामचे भगवान कोल्हारे, नगरपंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.प्रवीण निकम, वजन मापे निरीक्षक राकेश रावते, पुरवठा निरीक्षक संजय भिंगारदिवे, पुरवठा अव्वल कारकून संतोष बगाड, धनश्री वाडगे आदी उपस्थित होते.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)