ग्राहकांना सर्व शासकीय सेवा देणार

तहसीलदार आमले : राजगुरूनगरात ग्राहक दिन उत्साहात

राजगुरुनगर- ग्राहकांचे हक्क व अधिकार यांचा योग्य सन्मान ठेऊन त्यांना सर्व शासकीय सेवा देण्यात येतील, असे प्रतिपादन तहसीलदार सुचित्रा आमले यांनी राजगुरूनगर येथे केले.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत आणि अन्न नागरी पुरवठा व सरंक्षण विभाग,खेड तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिन आज (गुरुवारी) एसटी बस स्थानक आवारात साजरा करण्यात आला. यावेळी नागरिकांना मार्गदर्शन करताना तहसीलदार आमले बोलत होत्या. याप्रसंगी भूमी अभिलेख उपअधीक्षक उमेश झेंडे, आगर प्रमुख आर. जी. हांडे, एकात्मिक महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी एस. टी. दुधाळकर, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोर, तालुकाध्यक्ष देवानंद बवले, सचिव विलास वाडेकर, कोषाध्यक्ष अवधूत प्रसादे, सहसंघटक विठ्ठल दौंडकर, विजयानंद जाधव, केशव शिंदे, संजय सुर्वे यांच्यासह विविध शासकीय कार्यालयांचे खातेप्रमुख व नागरिक उपस्थित होते.यावेळी तहसीलदार सुचित्रा आमले यांनी विविध ग्राहकोपयोगी स्टॉल्सचे उद्‌घाटन केले.तहसीलदार सुचित्रा आमले यांनी महसूल विभागाच्या विविध ग्राहकाभिमुख योजनांची माहिती दिली. ग्राहक पंधरवडा कार्यक्रमात विविध ठिकाणी शिबिरे घेऊन जनजागृती केली जाईल. ग्राहकांचे हक्क व अधिकार यांचा योग्य सन्मान ठेऊन त्यांना सर्व शासकीय सेवा पुरविण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित खातेप्रमुखांना केले.
प्रदर्शनास उपविभागीय अधिकारी आयुष प्रसाद व गटविकास अधिकारी इंदिरा अस्वार यांनी भेट दिली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत वितरण महामंडळ, पंचायत समिती, पशुसंवर्धन विभाग, भूमी अभिलेख कार्यालय, कृषी विभाग, परिवहन महामंडळ, पुरवठा शाखा, अन्न व औषध प्रशासन, वजन माप वैधता कार्यालय, महसूल विभाग, गॅस कंपनी, पाटबंधारे विभाग यांनी माहितीपूर्ण स्टॉल्स उभारून ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण केले. तहसीलदार सुचित्रा आमले यांनी एसटी बसमध्ये जाऊन प्रवासी ग्राहकांना गुलाबपुष्प देऊन ग्राहकदिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवानंद बवले, सूत्रसंचालन अवधूत प्रसादे तर असंजय सुर्वे यांनी आभार मानले.

  • ग्राहकाने प्रत्येक विक्रेत्याकडे खरेदीची पक्की पावती मागावी. जेणेकरून त्याला त्रिस्तरीय ग्राहक न्यायालयात दाद मागता येते. ग्राहक न्यायालयात 90 दिवसांत निकाल दिला जातो. ग्राहकांनी फसव्या जाहिरातींपासून सावध रहावे. सर्व मोबाईल कंपन्यांनी आजीवन इनकमिंग मोफत असे भुलविले व आता इनकमिंग सुरू राहण्यासाठी प्रतिमाह शुल्क आकारात आहेत. याविरोधात ग्राहकांनी पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हा दाखल करा.
    – अशोक भोर, जिल्हा उपाध्यक्ष, अखिल भारतीय ग्राहक पंचायत 
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)