ग्राहकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे

राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात बोलताना तहसीलदार जयश्री आव्हाड, प्रा.पी.डी. कुलकर्णी व इतर.

तहसीलदार जयश्री आव्हाड

वडूज, दि. 25 (प्रतिनिधी) – ग्राहकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ग्राहक पंचायत करत असलेले कार्य स्तुत्य आहे. यासाठी अधिकारी वर्गानेही पंचायतीस सहकार्य करावे, असे आवाहन तहसिलदार जयश्री आव्हाड यांनी केले.
खटाव तहसिल कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात झाला. याप्रसंगी आव्हाड बोलत होत्या. खटाव तालुका ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष प्रा. डॉ. पी. डी. कुलकर्णी, माजी प्रांत संघटक सौ. यशोधरा पेठे, पुरवठा विभागाचे शेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जयश्री आव्हाड म्हणाल्या, ग्राहकांचे प्रश्न त्वरीत सोडण्यासाठी खटाव तालुक्‍यातील प्रत्येक कार्यालयील एकाच शासकीय अधिकारी व्यक्तीची निश्‍चिती ग्राहक पंचायत बैठकीसाठी करण्यात यावी. ग्राहकांच्या समस्याचा निपटारा त्वरीत करण्यासाठी सज्ज रहावे.
यावेळी ग्रीन शुगर सहकारी साखर कारखाना गोपूज (ता. खटाव) च्या थकीत बिलाबाबत चर्चा झाली. रेशनिंग दुकानातून ईन्टरनेट समस्येमुळे पावती निघत नसल्यामुळे तीन महिने धान्य न मिळाल्याची तक्रार मांडण्यात आली. बोंबाळे ता. खटाव येथील गट नंबर 377 च्या रेकॉड दुरुस्तीचे कामी न्याय मिळत नसल्याची तक्रार मांडण्यात आली. लांब पल्याच्या एसटी गाड्या वेळेत सुटत नाहीत, काही यात्रेमुळे स्थानिक गाड्या अचानक रद्द होत असल्याने विद्यार्थी, विद्यार्थीनी, जेष्ठ प्रवासी यांचे हाल होत असल्याचे सदस्यांनी सांगितले. अंबवडे येथे सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेमध्ये वीज मंडळाची बिले भरुन घेण्यास टाळाटाळ केली जाते, डांबेवाडी येथील पंढरीनाथ यशवंत नलवडे यांची औषध दुकानातून 25 हजारांची फसवणूक झाली असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या.
प्रास्ताविक प्रा. डॉ. पी. डी. कुलकर्णी यांनी केले. आभार सौ यशोधरा पेठे यांनी मानले.
यावेळी प्रा. डॉ. पी. डी. कुलकर्णी, गो. ज. कुलकर्णी, माजी प्राचार्य सिद्धराम गोसावी, श्रीकांत शेंडे, सुभाष घाडगे, नारायण पाटील, ऍड. संदेश सातभाई, प्रा. व्ही. व्ही जाधव, संभाजी इंगळे, बाळासाहेब घाडगे, दुय्यम निबंधक सहकारी पतसंस्था प्रतिनिधी, प्रा. अजय शेटे, श्रीमती पी. डी. कारंडे, तालुका कृषी अधिकारी प्रतिनिधी, सा. बांधकाम उपविभागचे हजारे, तालुका निरीक्षक भुमिअभिलेख प्रतिनिधी, श्रीरंग दुबळे, अजित पाटेकर तसेच ग्राहक उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)