ग्रामीण विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधी उपलब्ध व्हावी!

तळेगाव-दाभाडे – ग्रामीण भागातील विद्यार्थी हुशार असून त्यांनी दहावी-बारावीच्या शिक्षणावर न थांबता उच्च शिक्षणाचे ध्येय ठेवावे. त्यांच्यात जिद्द, चिकाटी, आणि उत्साह असतो. त्यांना शैक्षणिक संधी मिळाली तर ते यशाच्या शिखरावर नक्कीच पोहचतील, असे प्रतिपादन इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह रामदास काकडे यांनी केले.

संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त नवलाख उंब्रे येथील श्रीराम विद्यालयात नवीन वर्ग खोल्यांचे उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते. लार्सन ऍन्ड टूब्रो कंपनी तर्फे दोन नवीन वर्ग खोल्या बांधण्यात आल्या. नवीन वर्ग खोल्यांचा उद्‌घाटन व हस्तांतरण कंपनीचे डेप्युटी जनरल मॅनेजर संतोष रॉय यांच्या हस्ते झाले.

संस्थेचे खजिनदार केशवराव वाडेकर, माजी पंचायत समिती सदस्य बाजीराव शेटे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिवाजी भेगडे, प्राचार्य डॉ. डी. डी. बाळसराफ, बी. बी. जैन, जी. एस. शिंदे, उपप्राचार्य डॉ. एस. के. मलघे, मुख्याध्यापक सावळेराम गावडे, उपसरपंच ज्योती बधाले, साईनाथ यादव, सागर सौचे, संदीप कणसे, सुरेश शेटे, ग्रामस्थ आणि विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

संतोष रॉय म्हणाले, आम्ही देशभर अनेक ठिकाणी कामे केली आहेत. परंतु या ठिकाणचा उत्साह पाहून भारावून गेलो. विद्यालयाला दोन वर्ग खोल्या बांधून देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे. कंपनी हे फक्‍त माध्यम असून विकास हा सर्वांच्या सहकार्याने होणार आहे. शिवाजी भेगडे यांनी प्रास्ताविक, युवराज सोनकांबळे यांनी सूत्रसंचालन, तर मुख्याध्यापक सावळेराम गावडे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)