ग्रामीण रुग्णालयातील सुविधा समाधानकारक

 सत्यशील शेरकर ः सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त फळ वाटप

निवृत्ती नगर- भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या 72 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून जुन्नर तालुका कॉंग्रेस आय पक्षाच्या वतीने शुक्रवारी (दि. 7) छत्रपती शिवाजी महाराज ग्रामीण रूग्णालय जुन्नर येथे रूग्णांना फळवाटप करण्यात आले. यावेळी सत्यशिल शेरकर, तसेच सर्व पदाधिकारी यांनी ग्रामीण रुग्णालयामार्फत रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सोयी-सुविधांची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सदस्य तथा श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर, तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष अशोक घोलप, तालुका महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा अर्चना भुजबळ, बाजार समितीचे संचालक रंगनाथ घोलप, पुणे जिल्हा युवती कॉंग्रेसच्या अध्यक्षा प्रीती शिंगोटे, पुणे जिल्हा कॉंग्रेसचे प्रतिनिधी वैभव कोरडे, प्रदीप थोरवे, सुनील ढवळे, “विघ्नहर’चे संचालक देवेंद्र खिलारी, विष्णू शेरकर, पर्यावरण सेलचे तालुका अध्यक्ष सुखदेव नेहरकर, तालुका युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अंकुश खंडागळे, उपाध्यक्ष राहुल जाधव, जुन्नर ग्रामीण रुग्णालयाचे मेडिकल सुपरिटेंडेंट डॉ शिंदे, मेडिकल ऑफिसर डॉ. योगेश आगम, युवक कॉंग्रेसचे सर्व प्रतिनिधी, जुन्नर शहर कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष अंबर परदेशी, नितीन दांगट, शिरोली बुद्रुक कृषक संस्थेचे संचालक दगडु ढोमसे, राजेंद्र कवडे, ईश्वरनाथ शेळके, भानुदास पानसरे, बाळाभाऊ विश्वासराव, विजय भोर, रामदासशेठ बोऱ्हाडे, रिझवान पटेल, मा. सरपंच लक्ष्मण शेरकर, सरपंच सचिन विधाटे, अरूण मोहरे, संतोष खंडागळे, बाळासाहेब नायकोडी, विजय नायकोडी, संदिप शिंदे आदी मान्यवर तसेच तालुका कॉंग्रेसचे सर्व कार्यकर्ते, युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी, विविध संस्थाचे पदाधिकारी, विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलिस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते..
यावेळी सुभाष पाटील गावडे, मंगलदास सोलाट, जुन्नर तालुका कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मारुती वायळ आणि तालुकाध्यक्ष अशोक घोलप यांनी आपले मनोगत व्यक्त करून आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)