ग्रामीण भागात गरीबांच्या फ्रीजला अधिक मागणी

पाबळ – ग्रामीण भागात गरीबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठाला अधिक मागणी असते. मात्र, हे काही कारणांमुळे फुटतात. पाबळ (ता. शिरूर) येथील शंकर गोरे या विक्रेत्याने गरिबांचा फ्रीज (माठ) ची विक्री करताना सुमारे शंभर किलोची व्यक्ती उभी करा तरी माठ फुटणार नाही, याची गॅरंटी देत आहेत. यामुळे ग्राहकांनाही कोणताही प्रश्न राहत नसल्याने विक्री अधिक प्रमाणात होत असल्याचे त्यांनी सांगितले.

आजकाल सर्व सामान्यांना फ्रीज घेणे परवडत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात थंड पाणी पिण्यासाठी धावपळ सुरू होते. हे माठ गळके निघणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागते. यासाठी या मातीच्या माठाची भाजनी व्यवस्थित व्हावी लागते. तर ग्राहकांच्या अनेक शंकाची उत्तरे द्यावी लागतात. अखेर शेवटचा प्रश्न येतो तो म्हणजे माठाची गॅरंटी काय? आशा प्रश्नाला उत्तर देण्यापेक्षा ग्राहकालाच या माठावर उभे करून त्याची मजबुती दाखवली जात आहे. त्यामुळे या माठाची अधिक विक्री होत असल्याचे गोरे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)