ग्रामीण भागात काम करणे डॉक्टरांना अनिवार्य करावे- उपराष्ट्रपती

नवी दिल्ली : ग्रामीण भागात काम करणे डॉक्टरांना अनिवार्य करावे, असे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी सांगितले. डॉक्टरांची कार्यक्षमता वाढण्यासाठी त्यांच्यामध्ये सहानुभूती, अनुकंपा आणि काळजी घेण्याच्या मनोवृत्तीत वाढ होणे गरजेचे आहे. बंगळुरू येथे राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या 20व्या दिक्षांत समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमाला कर्नाटकाचे राज्यपाल वाजूभाई रुदाभाई वाला आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी आरोग्य क्षेत्राला पूर्णपणे वाहून काम करावे आणि दैनंदिन जीवनातील आव्हानांचा सामना करण्यासाठी तयार रहावे, असे ते म्हणाले. खासगी क्षेत्रातील आरोग्य सुविधा या गरजू आणि गरीब लोकांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध झाल्या पाहिजेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)