ग्रामीण भागातील डाकसेवा संपामुळे ठप्प

ग्रामीण भागातील डाक कर्मचा-यांना करावा लागतोय अडचणींचा सामना
शिर्डी – ग्रामीण भागात डाकसेवा पुरविणाऱ्या कर्मचाऱ्यांना अत्यंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. या कर्मचाऱ्यांच्या अडचणी लक्षात घेता कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगासह डॉ.कमलेशचंद्र कमिटीच्या सर्व शिफारशी लागु कराव्यात. या मागणीसाठी श्रीरामपुर डाक विभागातील शिर्डी एस.ओ.अंतर्गत ग्रामीण डाकसेवक कर्मचाऱ्यांनी मंगळवार (दि.22) पासुन संप पुकारला आहे. ग्रामीण डाक सेवकांच्या संपामुळे ग्रामीण भागातील डाक सेवा पुर्णत: ठप्प झाली आहे.
जीडीएस कमिटीच्या शिफारशी लागू करण्यासाठी सरकारकडे ग्रामीण डाक सेवकांच्या संघटनांनी व कर्मचा-यांनी वेळोवेळी निवेदने दिली. धरणे आंदोलने केली. संप पुकारला. परंतु केंद्र सरकारने ग्रामीण भागातील डाक सेवकांना अद्याप पर्यंत न्याय दिला नाही. याच पार्श्वभुमीवर शिर्डी सबऑफीसच्या बाहेर ग्रामीण डाकसेवक कर्मचा-यांनी संपुर्ण देशात पुकारलेल्या या देशव्यापी सपांस पाठिबा दर्शवत निदर्शने केली.
कर्मचार्यांनी पुकारलेल्या या संपाला ऑल इंडिया ग्रामीण डाक सेवक युनियन (एआयजीडीएसयु), नॅशनल युनियन ग्रामीण डाकसेवक व इतर संघटनाचे सदस्य सहभागी झालेले आहे.
यावेळी आंदोलक म्हणाले की, सर्व मागण्या मान्य होईपर्यंत संप कायम ठेवण्याचा निर्धार ग्रामीण डाक सेवकांनी केला आहे. या संपात शिर्डी सब ऑफीस अंतर्गत सावळीविहीर, रुई, सावळीविहीर फार्म, पिंपळवाडी, लक्ष्मीवाडी येथील ग्रामीण डाक सेवकांनी संपाला 100 टक्के पाठिंबा देत मंगळवार (22) पासुन काम बंद ठेवले आहे. यामुळे ग्रामीण भागात टपाल खात्यात चालणारे रोखीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. टपाल वाटप बंद झाल्याने ग्रामीण डाक सेवेवर परिणाम झाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)