ग्रामीण भागातील खेळाडुंना प्रोत्साहन द्यावे

विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील

मंचर- ऑलिंपिक स्पर्धेमध्ये भारताला फारसे यश मिळत नाही. त्यासाठी खेळाडुंना चांगल्या दर्जाचे प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे. सरकारने शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही खेळाडुंना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यवाही केली पाहिजे, अशी मागणी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केली.
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या पुढाकाराने मंचर येथील रामनगरी येथे राज्य अजिंक्‍यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने व पुणे खो-खो असोसिएशन संयोजित व आंबेगाव तालुका स्पोटर्स ऍकेडमीने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. खेळाडुंची ओळख दिलीप वळसे पाटील, शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विष्णु हिंगे, कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील समवेत अन्य मान्यवरांनी करुन घेतली.
रविवारी (दि. 25) सकाळी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांचा निकाल पुढीलप्रमाणे – पुणे संघाने अहमदनगर संघावर 13-4 असा 9 गुणांनी विजय मिळवून अंतिम फेरीत पोहचला तर ठाणे संघाने सांगली संघावर 12-11 असा 1 गुण 7 मिनिटे राखून विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. मुलींचा अंतिम सामना हा पुणे व ठाणे यांच्यात होणार आहे. खो-खो स्पर्धांचे उपांत्य फेरीचे सामने सकाळी सत्रात घेण्यात आले.त्यामध्ये मुलांच्या सामन्यांत पुणे संघाने सांगली संघावर 17-15 असा 2 गुणांनी विजय मिळविला तर नाशिक संघाने मुंबई संघावर 15-14 असा 1 गुणाने विजय मिळवत अंतिम फेरीत पोहचला.
आंबेगाव तालुक्‍यामध्ये क्रीडा स्पर्धा घेतल्याबद्दल नरसिंह क्रीडा मंडळ रांजणी व क्रीडा शिक्षक संदीप चव्हाण यांच्या वतीने आमदार दिलीप वळसे पाटील यांचा सत्कार खो-खो स्पर्धा नियोजन समितीचे अध्यक्ष देवदत्त निकम यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी खो-खो असोसिएशनचे महेश मेढेकर, भारतीय महासंघाचे सहसचिव प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव, राज्य खो-खो असोसिएशनचे सचिव संदीप तावडे, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार गोविंद शर्मा आदी उपस्थित होते. स्पर्धेचे नियोजन प्रशांत अभंग, संदीप चव्हाण, लक्ष्मण थोरात, ऍड. राहुल पडवळ, सुरेश भांगरे यांनी केले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)