ग्रामस्वच्छता पंधरवड्यांतर्गत पाच गोडाऊन परिसराची स्वच्छता

नगर – नेहरू युवा केंद्राच्या ग्रामस्वच्छता पंधरवड्यांतर्गत जय मल्हार शैक्षणिक व बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने केडगाव उपनगरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या महिलांनी केडगाव, पाच गोडाऊन परिसराची स्वच्छता करून सार्वजनिक स्वच्छतेची शपथ घेतली. स्वच्छता मोहिमेचे उद्‌घाटन नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक बाबाजी गोडसे, माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांच्या हस्ते झाले.

यावेळी नगरसेवक सुनील कोतकर, माजी सरपंच प्रभाकर गुंड, डॉ. रूपाली जाडकर, संस्थेचे अध्यक्ष काशिनाथ जाडकर, सचिव नीलम जाडकर, श्रीकांत जाधव, मुकेश दुधाडे, अजय जाडकर, भगवान पवार, प्रा. सुनील मतकर, आदींसह नागरिक सहभागी झाले होते.
प्रास्ताविकात काशिनाथ जाडकर यांनी संस्थेच्या वतीने चालू असलेल्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. बाबाजी गोडसे यांनी शहरासह तालुका पातळीवर चालू असलेल्या ग्रामस्वच्छता पंधरवड्याची माहिती दिली. माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर म्हणाल्या, “”शहरापेक्षा उपनगर ठिकाणी स्वच्छता मोहिमेची गरज आहे. सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. स्वच्छतेने वातावरण प्रसन्न राहून आरोग्य निरोगी राहते. नागरिकांना आपलेपणाची जाणीव नसल्याने ते परिसरात कचरा टाकत असतात. मात्र, या अस्वच्छतेने रोगराईची साथ पसरण्याची शक्‍यता असते.” नागरिकांमध्ये स्वच्छतेप्रती जागृती निर्माण करून संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)