ग्रामस्थांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन

गोंदवले – श्री ब्रह्मचैतन्य महाराज पुण्यतिथी महोत्सव चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी प्रशासनाबरोबरच ग्रामस्थांनी एकजुटीने काम करावे असे आवाहन तहसीलदार बी. एस. माने यांनी गोंदवले बुद्रुक येथे केले. श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा 105 वा पुण्यतिथी महोत्सव 23 डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्यानिमित्त तहसीलदार माने यांच्या अध्यक्षतेखाली यात्रा नियोजन बैठक ग्रामपंचायतीच्या सभागृहात झाली.

या बैठकीला समाधी मंदिर समितीचे विश्‍वस्त , विभागीय पोलीस अधिकारी अनिल वडनेर, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण कोडलकर, वीज कंपनीचे वाघ, एस.टी. आगार प्रमुख मोनाली पाटील, विस्तार अधिकारी अडागळे, सरपंच अश्‍विनी कट्टे, उपसरपंच संजय माने, ग्रामविकास अधिकारी अमोल पवार विविध विभागाचे अधिकारी, ग्रामपंचायतीचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सातारा- पंढरपूर रस्त्यालगत ही यात्रा भरत असल्याने वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून या काळात सकाळी नऊनंतर दुचाकीसाठी रस्ता बंद करण्यात येणार आहे. वाहनांवर कारवाईसाठी यंदा क्रेनचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी दिली. गावालगतच्या बंधाऱ्यांमध्ये गप्पी मासे सोडण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या. यात्रा काळात फिरत्या शौचालयाची सोय उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. धोकादायक विद्युततारा तात्काळ दुरूस्त करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, यावेळी यात्रा नियोजन बैठकीबाबत लेखी पत्र व्यवहार करूनही काही अधिकारी दरवर्षी अनुपस्थित राहतात याबाबत उपसरपंच संजय माने यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)