ग्रामस्थांना एकीमुळे गावाचा विकास शक्य

-ना.राम शिंदे ः आदर्शगांव मांजरसुंबा जिल्हा स्मार्टग्राम पुरस्काराने सन्मानित
-पुरस्काराने अधिक कार्य करण्याची प्रेरणा

नगर – गावकऱ्यांच्या एकीमुळे गावचा विकास शक्‍य झाला आहे. गावकऱ्यांची आप-आपसातील मतभेद विरुन एकीच्या जोरावर गावाचा विकास साध्य केला आहे. शासनाचे विविध पुरस्कार मिळविले आहे. मांजरसुंबा गावचा आदर्श नगर जिल्ह्यातील इतर गांवानी घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री ना.राम शिंदे यांनी केले.

प्रजासकत्ताक दिनानिमित्त पोलिस परेड ग्राऊंडवर आदर्शगाव मांजरसुंबा गावाला जिल्हा स्मार्ट ग्राम पुरस्काराने पालकमंत्री ना. राम शिंदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदि, पोलिस प्रमुख रंजनकुमार शर्मा, जि.प.अध्यक्षा शालिनीताई विखे, मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने, सरपंच जालिंदर कदम, जयराम कदम, इंद्रभान कदम, गोरक्षनाथ कदम, योगेश कदम, उपसरपंच पांडूरंग कदम, संभाजी कदम, तुकाराम वाखारे ग्रामसेवक सुरेश सौदागर आदि उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नगर तालुक्‍यातील रतडगांवला तालुकास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कारही पालकमंत्री ना.राम शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी सरपंच तुकाराम वाघुले, उपसरंपच दत्तू भोपे, ग्रामसेवक बी.के. पालवे उपस्थित होते. पालकमंत्री ना.शिंदे पुढे म्हणाले, नगर जिल्ह्यामध्ये शासनाच्या विविध योजना सक्षमपणे राबविल्या आहेत. शेवटच्या घटकापर्यंत विविध योजना प्रशासनाच्या माध्यमातून पोहचविण्याचे काम झाले आहे. प्रत्येक गावाने शासनाच्या विविध स्पर्धेमध्ये भाग घेतला पाहिजेत व आपल्या गावाचा विकास समाजासमोर आणला गेला पाहिजे, असेही ते म्हणाले.

याप्रसंगी सरपंच जालिंदर कदम म्हणाले, गेल्या 10 वर्षापूर्वी गावाने एकत्र येऊन गावच्या विकासाचा संकल्प केला होता. तो आज आम्ही सर्वांनी पूर्ण केला आहे. शासनाच्या विविध योजना गावामध्ये सक्षमपणे राबविल्या, त्यामुळे गावाचा विकास झाला. आज आमचे गाव आदर्शगांव म्हणून ओळखले जाते. शासनाच्या आदर्शगाव व संकल्प व प्रकल्प योजनेमध्ये गावाचा समावेश झाला आहे. आदर्शगांवचे योजनेचे कार्याध्यक्ष पोपट पवार यांच्या माध्यमातून या योजनांतर्गत भाग घेतला आहे. आज शासनाचे विविध पुरस्कार मिळावले आहे. कमिन्स इंडिया फौंडेशनच्या माध्यमातून गावाचा विकासास हातभार लागला आहे. प्रथम क्रमांकाचा जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार कामाच्या जोरावर गावाला मिळाला आहे. पुरस्कारामुळे अधिक काम करण्याची प्रेरणा मिळणार आहे, असेही ते म्हणाले. पुरस्कार मिळाल्याने ग्रामस्थांनी मोठा जल्लोष करुन आनंद व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)