सातारा, दि. 11(प्रतिनिधी)
वरिष्ठांच्या परवानगीशिवाय ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड घेऊन गेल्याप्रकरणी ग्रामसेवकाच्या विरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.कोडोली ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक के. एच. मोरे यांनी ग्रामपंचायतीचे 2011 ते 2015 या काळातील दप्तर यादी गायब केली होती. त्याविरोधात कोडोली ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडे तक्रार केली होती. दाखल तक्रारीनुसार जि.प ने सातारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले होते. गटविकास अधिकाऱ्यांनी सन 2017 मध्ये दिलेल्या अहवालात ग्रामसेवक मोरे यांनी दप्तर गायब केल्याच्या आरोपाला दुजोरा दिला होता. त्यानंतर ग्रामसेवका मोरे कळवुनही त्यांनी गायब केलेल्या दप्तर याद्या व दप्तर परत दिले नाही. त्यामुळे सातारा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी रविंद्र सुभाष दळवी यांनी ग्रामसेवक मोरे याच्या विरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दाखल गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक नानासो कदम करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)