ग्रामसुरक्षा दलाने रात्रीची गस्त वाढवा -चौधर

चिंबळी- केळगाव (ता. खेड) ग्रामसुरक्षा दलाच्यावतीने गावात रात्रीची गस्त वाढवावी, अनोखळी व्यक्‍तींसह गावामध्ये भाड्याने राहणाऱ्यांची माहती गोळा करून गावात सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना राबवाव्यात अशा सूचना आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र चौधर यांनी केल्या. आळंदी पोलीस ठाण्याच्या वतीने केळगाव येथे विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात आयोजित बैठकीत चौधर बोलत होते. याप्रसंगी विशेष शाखेचे शेंड, केळगावचे पोलीस पाटील युवराज वहिले, माजी सरपंच दिलीप मुंगसे, पांडुरंग मुंगसे, समाजिक कार्यकर्ते रमेश मुंगसे, पांडुरंग म्हस्के, हभप गुलाब मुंगसे, ज्ञानेश्‍वर मुंगसे आदी उपस्थित होते. दरम्यापन, यावेळी चौधर यांनी युपीएससी, एमपीएससी पुस्तकांसाठी 5 हजार रुपये जाहीर केले तर युवराज वहिले यांनी 10 रुपये शाळेतील ग्रंथालयासाठी दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब गुंड तर तुकाराम भांडवलकर यांनी आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)