ग्रामसभा न घेतल्यामुळे सरपंच अपात्र

जिल्हाधिकारी सिंघल यांच्या निर्णयामुळे खळबळ

पिंपोडे बुद्रुक – वाघोली ता. कोरेगाव येथील सरपंच बशीरखान कबीरखान पठाण यांनी 26 जानेवारी 2018 ची ग्रामसभा कायद्यातील तरतुदीनुसार घेतली नाही. यामुळे जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी कुमार निळकंठ भोईटे यांच्या तक्रारीवरून सरपंच बशीरखान कबीरखान पठाण यांना अपात्र करण्यात येत असल्याचा निकाल दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या वर्षी सरपंच बशीरखान कबीरखान पठाण यांनी कायद्यातील तरतुदीनुसार 26 जानेवारी 2018 ची ग्रामसभा घेतली नाही यामुळे त्यांच्या विरोधात कुमार निळकंठ भोईटे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. या अर्जाची सुनावणी जिल्हाधिकारी सिंघल यांच्यापुढे चालू होती. यामध्ये दोन्ही बाजूंना आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली. सरपंच यांच्या म्हणण्यानुसार 26 जानेवारी 2018 ची ग्रामसभा आम्ही 23 जानेवारीला घेतली होती. पण कोरम अभावी सभा तहकूब झाल्यामुळे सदर ग्रामसभा आम्ही 30 जानेवारी 2018 रोजी घेतली होती.

कुमार भोईटे यांच्या म्हणण्यानुसार 26 जानेवारी 2018 रोजीची ग्रामसभा हे कायद्याने बंधनकारक आहे व ती सभा न घेतल्यास सरपंचांवर कारवाई करण्यात येते. वाघोली गावच्या सरपंचांनी 26 जानेवारी 2018 च्या ग्रामसभेत बाबत कोणत्याही प्रकारचे गांभीर्य न दाखवता आपल्या सोयीनुसार ग्रामसभा घेतली, असे दाखवले. परंतु वास्तविक पाहता 26 जानेवारी 2018 रोजी वाघोली गावामध्ये ग्रामसभा मागणी असूनही घेण्यात आली नाही. सरपंच यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम क्रमांक 1958 कलम 7 चा भंग केला म्हणून जिल्हाधिकारी यांनी सरपंच यांना अपात्र करण्यात आल्याचा निर्णय दिला आहे. दरम्यान जिल्हाधिकारी यांच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये खळबळ उडाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)