ग्रामसभा तहकूब करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

सातारा, दि. 12 (प्रतिनिधी)- जिल्ह्यात 420 ग्रामपंचायतींनी 26 जानेवारी 2018 ची राज्य घटनेतील तारखेचा फेरफार करुन आपल्या स्वतःच्या मर्जीने ग्रामसभा घेतली. राज्यघटनेत दिलेल्या तारखेचा बहिष्कार टाकून 26 जानेवारी 2018 ची सभा तहकूब केली होती. याबाबत रिपाइंने जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करून सरपंच व ग्रामसेवकांवर गुन्हा नोंद करुन कडक कार्यवाईची मागणी केली होती. तसेच मुख्यमंत्री यांनाही निवेदनपत्र देवून दखल घेण्याची मागणी केली होती. त्यास एक वर्ष उलटून गेले जिल्हा प्रशासनाने कारवाई दूरच तसेच कोणतीही ठोस उत्तरही दिले नाही.येत्या 4 मार्चपर्यंत मागणीची दखल घेवून ग्रामसभेचे अध्यक्ष व सचिव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा दि. 5 मार्चला मुंबई मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशाराही रिपाइंचे अल्पसंख्यांक आघाडीचे फारुख पटणी यांनी निवेदनात दिला आहे.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)