ग्रामरोजगार सेवकांकडून जलसाठ्यांची गणना होणार

850 रुपये मानधन मिळणार

नगर – राज्यातील सर्व जलसाठ्यांच्या ठिकाणांची गणना यावर्षीपासून नव्या पद्धतीने सुरू होणार आहे. शेततळी, गावतलाव, जलयुक्त शिवार योजनेतून केलेल्या विविध कामांची गणना करण्यात येणार आहे. अशा प्रकारे जलसाठ्यांची गणना करण्याची ही सहावी वेळ आहे. यावेळी प्रत्येक जलसाठ्याची छायाचित्रेही घेतली जाणार असून या कामासाठी ग्रामरोजगार सेवकांचा उपयोग करून घेतला जाणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रत्येक गावातील जलसाठे मोजण्यासाठी त्यांना 850 रुपयांचे मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जलसाठ्यांची गणना करताना किती ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत,याची माहिती केंद्रीय संसदीय समितीला हवी असल्याने वेगळ्या पद्धतीने जलसाठे गणना केली जाणार आहे. यापूर्वी 2013 – 14 मध्ये पूर्ण झालेल्या सर्वेक्षणानुसार राज्यातील 33 जिल्ह्यामध्ये 19 लाख 63 हजार 38 विंधण विहिरी घेण्यात आलेल्या होत्या. त्यातील काही विंधण विहिरी अतिखोल असल्याच्याही नोंदी होत्या. तर भूपृष्ठावरील पाणवठ्यांची संख्या दोन लाख 82 हजार 880 एवढी होती. त्याचबरोबर कोणत्या नदीवर बंधारे बांधले, कोणते नदीप्रवाह अडविले याचीही माहिती गोळा करण्यात आली होती.

त्या सर्वेक्षणानुसार राज्यात 22 हजार 907 तर नदीवर 89 हजार 921 धरणे व बंधारे बांधले होते. केवळ एवढेच नाही तर गावतलाव, शेततळी यांची संख्याही 40 हजार 425 एवढी असल्याचे दिसून आले होते. अन्य राज्यांच्या तुलनेत हे प्रमाण खूप असले तरी राज्यात नेहमीच पाण्याची ओरड असतेच. आता तर दुष्काळच असल्याने पाण्याचे नवनवीन स्रोत शोधले जातात. गेल्या काही वर्षांत करण्यात आलेल्या या माहितीची पडताळणी करताना यावर किती अतिक्रमणे झाली आहेत, हे पाहण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला जात आहे.

 

खाजगी एजन्सीमार्फत एटीएममध्ये पैसे भरण्याचे काम केले जाते. हे काम करताना त्यांनी व्हान व सोबत गार्ड ठेवणे गरजेचे. मात्र सबंधित कंपनी कोणत्याही सुविधा देत नाही. कर्मचारी रोज दुचाकीवरून घेऊन जातात. बॅंक म्हणते पैसे चोरीला गेले तर एजन्सी जबाबदार आणि एजन्सी म्हणते विमा कंपनीची जबाबदारी त्यामुळे पोलिसांचे काम वाढते.
रोहिदास पवार
अतिरिक्‍त पोलीस अधीक्षक.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)