ग्रामपंचायत हद्दीत अतिक्रमण करणाऱ्यावर कारवाई

योगेश पाटे ः महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त नारायणगावात ग्रामसभा

नारायणगाव- नारायणगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत अतिक्रमणे करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा नारायणगावचे सरपंच योगेश पाटे यांनी ग्रामसभेत दिला .
महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त नारायणगाव ग्रामपंचायतीची ग्रामसभा बुधवारी (दि. 28) आयोजित करण्यात आली होती, यावेळी ग्रामसभेच्या अध्यक्षपदावरून योगेश पाटे बोलत होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य आरिफ आतार, विजय वाव्हळ, रामदास अभंग, रुपाली जाधव, सारिका डेरे, अनिता कसाबे, अश्विनी ताजने, सुप्रिया खैरे, कुसुम शिरसाठ, पुष्पा आहेर, संगीता खैरे, मनीषा मेहेत्रे, ग्रामविकास अधिकारी एन. जे. नाईकडे, अनिल खैरे, सतीश पाटे,रमेश पाटे आदी मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी केंद्र सरकार, राज्य सरकार, जिल्हा परिषद व सर्व विभागामार्फत निधीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे सरपंच योगेश पाटे यांनी सांगितले.
ग्रामसभेत मागील कामकाजाचे वृत्तांत, स्वच्छ भारत अभियान, प्लॅस्टिक बंदी अभियान, 2019-20 च्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे, फेरआकारणी करणे, विविध विकासकामांबाबत चर्चा करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी गावकारभार तलाठी सोनावणे यांनी विविध योजनेचे माहिती देतानाच 7-12 ऑनलाइन काम चालू असून, काही दुरुस्ती असल्यास तात्काळ मदत केली जाईल, असे आश्वासन दिले. सभेचे सूत्रसंचालन गणेश पाटे यांनी केले, प्रास्ताविक राजेश बाप्ते यांनी केले, तर उपसरपंच संतोष दांगट यांनी आभार मानले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)