ग्रामपंचायत हद्दीतील पथदिवे दिवसरात्र सुरू

उरुळी कांचन- येथील ग्रामपंचायत हद्दीतील पथदिवे दिवस-रात्र सुरू असल्याने विजेचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होत आहे. ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांचे वीज बिल जिल्हा परिषदेला भरावे लागत असल्याने उरुळी कांचन ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा आर्थिक बुर्दंड जिल्हा परिषदेला सोसावा लागत आहे
उरुळी कांचन (ता. हवेली) येथील पांढरस्थळ वस्ती, तुपे वस्ती, इरिगेशन कॉलनी, दत्तवाडी (भवरापूर रस्ता) या भागातील सर्व पथदिवे गेल्या सहा महिन्यांपासून दिवस-रात्र सुरू राहत आहेत. एकीकडे राज्य शासन व महावितरणकडून अनेकदा विजेच्या बचतीसाठी नागरिकांना आवाहन केले जाते; उरुळी कांचन ग्रामपंचायत प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे विजेचा अपव्यय होत आहे. वारंवार तक्रारी करूनही स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

  • गावातील अनेक भागांमध्ये पथदिवे दिवस-रात्र सुरू राहत असल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. त्यानुसार ग्रामपंचायतीच्या वीजपुरवठा आणि दुरुस्ती विभागातील कर्मचाऱ्यांना संबंधित भागातील पथदिव्यांची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच संबंधित कर्मचाऱ्याने पथदिव्यांची दुरुस्ती न केल्यास त्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.
    – कैलास कोळी, ग्रामविकास अधिकारी

 


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)