ग्रामपंचायत सदस्य मयुर ढोरे यांनी स्वखर्चातून भुयारी गटाराचे काम केले पूर्ण

वडगाव मावळ : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या भुयारी गटाराचे काम स्वखर्चातून करताना ग्रामपंचायत सदस्य मयूर ढोरे व अन्य कार्यकर्ते.

वडगाव मावळ – माळीनगर येथे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या भुयारी गटाराचे काम ग्रामपंचायत सदस्य मयूर ढोरे यांनी पुढाकार घेवून स्वखर्चातून पूर्ण केले. माळीनगर परिसरातील सांडपाण्याच्या भुयारी गटाराचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. दूषित सांडपाणी साचल्याने दुर्गंधीयुक्‍त वास येत होता. तसेच त्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात गावात वाढले होते. या पाण्यामुळे डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर होत असल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले होते. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत सदस्य मयूर ढोरे यांनी पुढाकार घेवून “जेसीबी’च्या सहाय्याने भुयारी गटाराचे काम पूर्ण केले.

या अनेक वर्षांच्या गटाराचे काम पूर्ण झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्‍त केले. या वेळी ग्रामपंचायत सदस्य मयूर ढोरे, नंदू म्हाळसकर, गणेश म्हाळसकर, रवींद्र बोठे, अंकेश ढोरे, सचिन वाडेकर, गणेश बरदाडे, यशवंत शिंदे व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)