ग्रामपंचायत निवडणुकांत जेवळावळींना ऊत

लाखणगाव- आंबेगाव तालुक्‍यातील दहा गावांतील ग्रामपंचायतीच्या निवडणुका सध्या सुरू झाल्या असून जेवणावळींना उत आला आहे. तसेच तरूणांनी निवडणूक हातात घेतल्याने ज्येष्ठांनी फक्त मार्गदर्शकाची भूमिका घेतली आहे.
आंबेगाव तालुक्‍यातील टाव्हरेवाडी, फुलवडे, लोणी, पारगाव कारखाना, कानसे, डिंभे बुद्रुक, तांबडेमळा, अवसरी बुद्रुक, सुपेघर, चपटेवाडी येथील ग्रामपंचायतीची निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून सरपंच थेट जनतेतून निवडले जाणार असल्यामुळे सरपंच पदासाठी उभे राहणऱ्यांची संख्या वाढली आहे. त्याचप्रमाणे सरपंचाच्या अधिकारात वाढ करण्यात आली असल्याने आणि ग्रामपंचायत सदस्यांचे महत्त्व कमी झाल्याने ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडणूक लढवणाऱ्यांमध्ये म्हणावा तसा उत्साह पहावयास मिळत नाही.अनेक गावातील ग्रामपंचायत सदस्यपदासाठी अनेक जण बिनविरोध निवडून आले असून सरपंच पदासाठी मोठ्या प्रमाणावर रस्सीखेच सुरू असून निवडणुकीमध्ये तरुणांची संख्या अधिक असून ज्येष्ठांनी मात्र मार्गदर्शकाची भूमिका घेतली आहे. या तरुणांमध्ये उच्चशिक्षित तरुणांची संख्याही मोठी आहे.त्यामुळे राजकारणात होणारा हा बदल नक्कीच स्वागतार्ह असून उच्चशिक्षित व तरुण सरपंच गाव विकासासाठी फायदेशीर ठरेल ही भूमिका मतदारांमधून बोलली जात आहे.

  • सोशल मीडियचा मोठ्या प्रमाणात वापर
    तरुणांकडून निवडणूक प्रचारासाठी मोठ्‌या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर केला जात आहे.त्यामुळे पारंपरिक पद्धतीने प्रचार करणारे ज्येष्ठ तर आधुनिक पद्धतीने हायटेक प्रचार करणारे तरुण यामुळे तरुण वर्ग सरस ठरत असून येणाऱ्या कालखंडात राजकरणात तरुणांची संख्या नक्कीच वाढेल. आणि त्याचा फायदा ग्रामविकासासाठी होईल, असे चित्र ग्रामपंचायत निवडणुकीवरुन दिसत आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)