ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता यादी चुकीची

निघोज – जिल्हा परिषदेकडे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची तात्पुरती सेवाज्येष्ठता यादी सादर करण्यात आली. त्यामध्ये बहुतांश तफावत असून, जुन्या व कार्यक्षम कर्मचाऱ्यांवर अन्याय केला असून ती यादी जिल्हा परिषदेने ग्राह्य धरू नये, अशी मागणी जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने केली आहे.
याबाबत जिल्हाध्यक्ष ऍड. सुभाष लांडे, सचिव ऍड. सुधीर टोकेकर, कार्यकारिणी सदस्य मारुती सावंत, संजय डमाळ, गोरख शिर्के, रमेश तांबे, विष्णू वाघ, प्रभाकर शेंडगे, विठ्ठल कावरे, धनराज गजरमल, संदीप आल्हाट, राहुल पोळ, प्रशांत उपाध्ये, पारनेर तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष दादाभाऊ चौधरी, आदींनी निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले की, ग्रामपंचायत कर्मचारी नावे समाविष्ट करताना पंचायत समिती व जिल्हा परिषद पातळीवर कोणत्याही मूळ कागदपत्रांची तपासणी करण्यात आलेली नाही. सेवाज्येष्ठता यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी आवश्‍यक असणारा विहीत नमुन्यातील प्रस्ताव न स्वीकारता पंचायत समिती स्तरावरील केवळ नमुना “ग’च्या माहितीच्या आधारे यादी तयार करण्यात आलेली आहे. 2016 या यादीमध्ये गंभीर दोष आहेत. काही कर्मचाऱ्यांचे वय 18 पेक्षा कमी आहे. त्यांनाही यादीत स्थान देण्यात आले आहे. ज्यांचे वय 45 आहे मात्र शिक्षण चौथी आहे, जे मयत आहेत कामावर नाहीत, ज्यांची सेवा खंडित झाली आहे अशा अनेक गंभीर चुका यादीत झालेल्या आहेत. अशांना सेवाज्येष्ठता यादीत घेऊन नियमित काम करणाऱ्या व कार्यक्षम अशा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर अन्याय करण्यात आला आहे. यासाठी ही यादी पुन्हा नियमावलीत बसूनच तयार करण्यात येऊन कुणावरही अन्याय होऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)