वाघोली-ग्रामपंचायत कार्यालयामध्ये शिवीगाळ व दमदाटी करून तुझी नोकरी घालवतो अशी धमकी दिल्याप्रकरणी केसनंद येथील युवकावर लोणीकंद पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ग्रामविकास अधिकारी पोपटराव धोंडीबा वेताळ यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सचिन रंगनाथ धुमाळ असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामविकास अधिकारी पोपटराव वेताळ हे बुधवारी (दि. 23) सकाळी केसनंदच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कर्तव्य बजावत असताना सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास सचिन धुमाळ याने सरकारी कामात अडथळा आणून शिवीगाळ, दमदाटी केली व तुझी नोकरी घालवतो अशी धमकी दिली. जीवितास धोका निर्माण झाला असल्याने वेताळ यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास लोणीकंद पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)