ग्रामपंचायतीच्या माजी सदस्याने शिरगावात स्वखर्चातून सौरदिव्यांची व्यवस्था

शिरगाव : येथे अरुणा अरगडे यांनी स्वखर्चातून सौरदिव्याची केलेली व्यवस्था.

सोमाटणे – परिसरात नव्याने वाढत असलेली वस्ती व सध्या पावसाचे असलेले दिवस त्यामुळे येथील नागरिकांना साप, विंचू व इतर बाबींपासून बचाव होण्यासाठी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य अरुणा अरगडे यांनी स्वखर्चातून पाच सौर दिवे व ठिकठिकाणी खांबावर जवळपास 20 एलईडी बल्ब बसविण्यात आले.

या दिव्यामुळे येथील नागरिकांची मोठी सोय झाली. काही शाळकरी मुले दिव्यांचा अभ्यासासाठी देखील उपयोग करत आहेत. तर उशिरा अंधारातून येताना वाटणारी भीती देखील कमी झाली आहे. यापूर्वी त्यांनी जिल्हा परिषद शाळेला वॉटर फिल्टर बसवून दिला. तसेच माध्यमिक विद्यालयातील गरजू मुलींसाठी सायकलची देखील व्यवस्था केली होती. अपंग व्यक्तींसाठी खुर्च्या वाटप व गरजू व्यक्तींसाठी पाण्याची नळ जोडणी आगदी मोफत करण्यात आली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)