ग्रामपंचायतींच्या वर्धापनदिनानिमित्त कान्हे येथे माजी पदाधिकाऱ्यांचा गौरव

टाकवे बुद्रुक – मावळ तालुक्‍यात नाव लौकीकात कान्हे ग्रुप ग्रामपंचायतीच्या हीरक महोत्सवी वर्धापनदिन नुकताच साजरा करण्यात आला. कान्हे ग्रामपंचायतीला 27 जुलै 1958 रोजी स्थापन झालेल्या 60 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त कान्हे, नायगाव, जांभुळ, सांगवी येथील विकासकामांच्या योगदानाबद्दल आजपर्यंतच्या नऊ पंचवार्षिक कार्यकारिणीच्या 80 माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य यांना ग्रुप ग्रामपंचायत कान्हेतर्फे कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

माजी आदर्श कर्मचारी किसन सातकर यांना 40 वर्षे अखंड सेवेबद्दल गौरविण्यात आले. या वेळी प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, माजी सरपंच मारुती सातकर, वसंतराव सातकर, नंदा सातकर, कुमाजी आनंदे, रवींद्र गायकवाड, अर्जुन कुंभार, लक्ष्मण सातकर, बाळासाहेब खांदावे, सरपंच राजश्री सातकर, पूनम सातकर, मीना चव्हाण, जिजाबाई वावर, मधुरा ओव्हल, विष्णू सातकर, सागर येवले, सतीश सातकर, ताराबाई भोईर, शांताराम धेंडे, माजी सरपंच-उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ उपस्थितीत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या वेळी माजी पदाधिकारी ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, मारुती वावरे, बाळासाहेब खांदवे यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आपल्या कार्यकाळात कान्हे गावाचा विकास कशाप्रकारे केला. भविष्यात कान्हे ग्रामपंचायत विकासाचे मॉडेल बनविण्यासाठी सध्याच्या पदाधिकाऱ्यांनी व पुढील येणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे तसेच शासनाकडून अधिक योजना गावात आणण्यासाठी पदाधिकारऱ्यांनी सतत शासनदरबारी पाठपुरावा करीत रहावे, असे आवाहन ज्येष्ठ नेत्यांनी माजी पदाधिकाऱ्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदस्य राजेंद्र सातकर यांनी केले. स्वागत माजी उपसरपंच प्रदीप ओव्हळ यांनी केले. प्रास्तविक माजी उपसरपंच किशोर सातकर यांनी केले. उपसरपंच अभिजीत सातकर यांनी आभार मानले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)