पुणे: ग्रामपंचायतींचे थकलेले वीजबिल भरणार

राज्याची सूचना : ग्रामनिधी, 14 व्या वित्त आयोगाचा पर्याय

पुणे – जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे पथदिव्यांच्या वीजबिलापोटी तब्बल तीन कोटी रूपयांची थकबाकी आहे. दरम्यान, 31 मार्च रोजी आर्थिक वर्ष संपत असल्याने त्याआधी ही थकबाकी भरावी, असे पत्र थेट राज्य शासनाने पुणे जिल्हा परिषदेला पाठविले आहे. त्यानुसार ग्रामनिधी आणि 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून ही थकबाकी भरली जाऊ शकते, असेही सूचवण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यातील हवेली, खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव, मुळशी यांसह 13 तालुक्‍यांत तब्बल 1 हजार 401 ग्रामपंचायती आहेत. त्यांच्या हद्दीतील पथदिव्यांचे वीजबिल अनेक महिन्यांपासून थकलेले आहे. या बिलापोटी ग्रामपंचायतींकडे एकूण 2 कोटी 99 लाख 95 हजारांची थकबाकी आहे. याबाबत महावितरणने वेळोवेळी ग्रामपंचायतींशी पत्रव्यवहार केला होता. मात्र, अनेक दिवसांपासून हे वीजबिल भरण्यात आले नाही. त्यामुळे या पथदिव्यांची वीज खंडीत होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

दरम्यान, याबाबत राज्य शासनाने हस्तक्षेप केला असून थकीत बीजबीलाची रक्कम भरण्याबाबत जिल्हा परिषदेला सूचना केल्या आहेत. त्यानुसार ग्रामनिधी आणि 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून हे थकीत वीजबिल भरण्यात येणार आहे, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) संदीप कोहिनकर यांनी सागितले. ग्रामपंचायत हद्दीतील पथदिव्यांचे थकीत वीजबील भरण्याची सूचना राज्य शासनाने पत्राद्वारे जिल्हा परिषदेला दिली आहे. त्यानुसार लवकरच ग्रामनिधी आणि 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून ही थकबाकी भरण्यात येणार आहे. तशा सूचना जिल्हा परिषदेने संबंधित ग्रामपंचायतींना दिल्या आहेत, असे कोहिनकर यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)