ग्रामपंचायतींचा निधी आता एका क्‍लिकवर कळणार

“पीएफएमएस’प्रणाली विकसित : पुणे जिल्हा परिषद अव्वल

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 4 – चौदावा वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायतींना प्रदान करण्यासाठी केंद्रशासनाकडून पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टीम (पीएफएमएस) प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीवर ग्रामपंचायतींची नोंदणी करण्यामध्ये पुणे जिल्हा परिषद अव्वल स्थानी ठरली आहे. त्यामुळे आता एका क्‍लिकवर जिल्ह्यातील कोणत्याही ग्रामपंचायतीमधील निधीचा तपशील पाहता येणार आहे.

केंद्र शासनाकडून चौदाव्या वित्त आयोगाचा निधी सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना दिला जातो. परंतू, हा निधी ग्रामपंचायतींना देण्यासाठी प्रथमत: केंद्रस्तरावरून राज्य स्तरावर निधी येत होता. त्यानंतर राज्य स्तरावरून जिल्हा परिषदेत आणि तेथून मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांच्यामार्फत सर्व ग्रामपंचयतींना हा निधी वितरीत केला जात होता. त्यामध्ये बराच वेळ आणि डोकेदुखी होती.

दरम्यान, हा निधी केंद्र शासनाकडून थेट ग्रामपंचायतींना जावा आणि त्या निधीवर देखरेख राहावी यासाठी पीएफएमएस ही प्रणाली विकसित करण्यात आली. त्यानुसार या प्रणालीच्या माध्यमातून आता थेट ग्रामपंचायतींना निधी वितरीत करण्यात येणार आहे. या प्रणालीवर ग्रामपंचायतीला प्राप्त झालेला निधी आणि खर्च याबाबतची सर्व माहिती एका क्‍लिकवर पाहता येणार आहे. तसेच पुरवठादार किंवा ठेकेदार यांची देयके धनादेश आणि “डीएससी’च्या माध्यमातून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

—————————————-
या निधींची मिळणार माहिती
प्रणालीमध्ये आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून पुणे जिल्ह्याने सर्व ग्रामपंचायतींचे रजिस्ट्रेशन पूर्ण करून राज्यामध्ये प्रथम क्रमांक पटकविला आहे. त्यामध्ये गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, तालुका व्यवस्थापक आणि केंद्राचालक यांचा मोलाचा वाटा असून, मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच या प्रणालीमुळे ग्रामपंचायतीकडे निधी किती शिल्लक आहे, खर्च कशापद्धतीने केला जात आहे, अखर्चित निधी किती याची सविस्तर माहिती मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येकवेळी ग्रामपंचायतींकडून वेगवेगळी माहिती मागविण्याची आवश्‍यकता नसून, विकास कामांना गती देण्यास ही प्रणाली सर्वोत्तम असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)