ग्रंथ हे विकारातून विचाराकडे जाण्याचे माध्यम

प्रा. प्रकाश पायगुडे यांचे प्रतिपादन

सातारा – सोशल मीडियावर माहितीचा खजाना आहे. पण ज्ञान मिळवून देण्याचे काम ग्रंथच करत असतात. विकारातून विचाराकडे जाण्याचे एकमेव माध्यम म्हणजे ग्रंथ आहेत. असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक प्रा. प्रकाश पायगुडे यांनी केले. ते ग्रंथ महोत्सवात इथे घडतात वाचक वक्ते येथे घडतात या परिसंवादात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर साहित्य परिषदेचे शिरीष चिटणीस, डॉ. शेलजा माने, शाहूपुरीचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रा. पायगुडे म्हणाले, साताऱ्याची माती खरच नशिबवान आहे. कारण महात्मा फुले, सावित्री फुले, यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे थोर विचारवंत या जिल्ह्याला मिळाले. यशवंतराव चव्हाण राजकारणात गेले नसते, तर साहित्यिक म्हणूनच ते जगासमोर आले असते. गेली वीस वर्ष साताऱ्यात सुरु असलेला हा ग्रंथ महोत्सव आता राज्याचा झाला आहे.
सोशल मीडियावर मिळत असलेली माहिती फक्त माहितीच असते. मात्र ग्रंथामुळे ज्ञान मिळते. त्यामुळे मुलांनी ग्रंथाचे अधिकाधिक वाचन करावे.

मुलं काय वाचतात यावर त्यांच्या पिढीचे भविष्य अवलंबून असते. त्यामुळे पालकांनी मुलांची आवड ओळखून त्यांना वाचनाची सवय लावण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी डॉ. शैलजा माने यांनी शारिरीक व्यायामासोबत बौध्दीक व्यायाम आवश्‍यक असल्याचे सांगताना त्यासाठी वाचनाची आवड असावी लागते, असे स्पष्ट केले. ग्रंथाला दाद देणारा वाचक साताऱ्याच्या मातीत असल्याचे सांगत तरूणपणातील आघातच माणसाला भविष्यातील संधी तयार करुन देतो, असे सांगितले. यावेळी पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, पालक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)