ग्रंथ वाचनाने माणूस घडतो – डॉ. साळवे

खेड शिवापूर- वाचन संस्कृती वाढावी, विद्यार्थ्यांचा तसेच समाजाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी वाचन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मत शंकरराव भेलके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तानाजी साळवे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात मांडले. महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथालय दिनानिमित्त आयोजित ग्रंथप्रदर्शन उपक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. आर. व्ही.ढेरे, प्रा. संजय झगडे आदी उपस्थित होते. ग्रंथप्रदर्शनामध्ये महान व्यक्तींची चारित्र्ये, मराठी वाङ्‌मय, स्पर्धा परीक्षा, कथा व कादंबऱ्या अशा वेगवेगळ्या ग्रंथांचा समावेश हता. महान व्यक्तींची चारित्र्य, कथा, कादंबऱ्यांचे वाचन केले तर आपला सर्वांगीण, तसेच बौद्धिक विकास होतो असे महाविद्यालयाचे प्राचार्य याप्रसंगी विद्यार्थ्यांशी बोलत होते. महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विध्यार्थी यांनी या कार्यक्रमामध्ये उस्फूर्तपणे भाग घेऊन वाचनाविषयी आपले प्रेम ग्रंथ व्यक्त केले. यावेळी प्राचार्य डॉ. तानाजी साळवे यांच्या हस्ते महाविद्यालयातील पूजा शिळीमकर, मंगल खुटवड, पूजा यादव, ऋषीकेश, सोमनाथ वाईकर या विद्यार्थ्यांना ग्रंथ वाटप करून ग्रंथालयाचे आणि ग्रंथालयात असणाऱ्या महान ग्रंथांचे महत्त्व पटवून सांगितले गेले.
ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी भारताला दिलेल्या ग्रंथालयाचा वारसा आणि वाचन संस्कृती टिकावी आणि भविष्यात ग्रंथालयाचे महत्त्व टिकून राहावे, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. भगवान गावित यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तानाजी साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)