चार वर्षात कर्मचाऱ्यांबाबत काहीच निर्णय घेत नसल्याबाबत निषेध
रहिमतपूर – राज्यातील 12 हजार 601 सार्वजनिक ग्रंथालयातील ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल, लिपिक, शिपाई यांनी दि. 1 पासून काळ्या फीती लावून काम करण्यास सुरुवात केली. ग्रंथालय सेवकांना कमी मानधनावरच काम करावे लागत असून याबाबत गेल्या साडेचार वर्षात काहीच निर्णय घेतला नसल्याच्या निषेधार्थ ग्रंथालय सेवकांनी आंदोलन सुरू केले आहे.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीस मंत्रीमंडळ बोलवत नाहीत, तोपर्यंत आंदोलन तसेच चालू राहणार असल्याची माहिती जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष व केंद्रिय कार्यकारिणी सदस्य संजय जंगम यांनी दिली.
रहिमतपूर येथील हिंद वाचनालयाचे ग्रंथपाल विलास शिंदे, सहाय्यक संजय जंगम, लिपिक कु. उमा सावंत, शिपाई सर्जेराव कारंडे यांनीही आंदोलनात सहभाग घेतला. दत्तात्रय वीर, सर्व संचालक यांच्यासह वाचक सभासद यांनी आंदोलनास पाठिंबा दिला.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा