‘ग्रंथालयाचे महत्व वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा’

पुणे – कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल मिडीया, इंटरनेट अशा गोष्टींचा प्रभाव वाढणाऱ्या सध्याच्या काळात अध्यापन शैलीप्रमाणे ग्रंथालयांनीही कार्यपद्धतीमध्ये कालानुरूप बदल करणे गरजेचे आहे. नॅक मूल्यांकनामध्ये ग्रंथालयाच्या कामकाजाचे निकष आवश्‍यक करण्यात आल्याने ग्रंथालयाचा दर्जा आणि महत्त्व वाढण्यास मदत होणार असल्याचे माजी कुलगुरू डॉ. राम ताकवले यांनी सांगितले.

यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने “नॅक मूल्यांकन मिळविण्यासाठी ग्रंथालयांची तयारी’ या विषयावर आयोजित एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेत डॉ. चंद्रकांत रावळ, डॉ. जगदिश कुलकर्णी, डॉ. विजय कांची, डॉ. स्वाती बर्नाबस, ऋषाली दंडवते, सुधीर येवला, डॉ. भाऊसाहेब पांगे यांनीही मार्गदर्शन केले.

महाविद्यालयीन शिक्षण प्रणालीमध्ये प्राध्यापकांद्वारे केल्या जाणाऱ्या अध्यापनासोबत ग्रंथालयाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी व व्यक्तिमत्त्व विकासासाठी ग्रंथालयाचे योगदानही महत्त्वाचे आहे. ग्रंथालयातील ज्ञानभांडार विद्यार्थ्यांच्या ज्ञानाजर्नात रूपांतर करण्याच्या प्रक्रियेत ग्रंथपालांची भूमिका महत्त्वाची आहे. मात्र, ग्रंथपालांनीही आपल्या कामकाजात अधिकाअधिक विद्यार्थीभिमुखता आणण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली पाहिजे, असेही ताकवले म्हणाले.

या एकदविसीय कार्यशाळेत
प्रास्ताविक “यशस्वी’ संस्थेचे अध्यक्ष विश्‍वेश कुलकर्णी यांनी केले. तर आभार डॉ. राजेंद्र सबनीस यांनी केले. यावेळी आयआयएमएसचे संचालक डॉ. मिलिंद मराठे उपस्थित होते. कार्यशाळेसाठी समन्वयक म्हणून पवन शर्मा यांनी काम पाहिले. या कार्यशाळेसाठी आदिती चिपळूणकर, प्रा. सारंग दाणी, प्रा. अमर गुप्ता आदींनी विशेष सहकार्य केले. सूत्रसंचालन योगेश रांगणेकर यांनी केले.

ग्रंथपालांनाही अन्य शैक्षणिक कर्मचाऱ्यांप्रमाणेच आदर द्यायला हवा. एकीकडे आपण विद्यार्थी केंद्रित शिक्षण प्रणालीकडे वाटचाल करीत असताना ग्रंथालयांचा चेहरा मोहराही आनंददायी ठरायला हवा. निराशाग्रस्त शांततेऐवजी उत्साही वातावरणनिर्मिती तयार करण्यासाठी ग्रंथपालांनी पुढाकार घ्यायला हवा. ग्रंथालय हा सातत्याने वृद्धिंगत होत जाणारा घटक असल्याने तितक्‍याच गांभीर्याने लक्ष देण्यासाठी ग्रंथपालांसोबतच संस्थाचालकांनीही पुढे यायला हवे, असे डॉ. प्रफुल्ल पवार यांनी म्हटले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
26 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)