ग्रंथश्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वरी पारायण व प्रवचन सोहळा

निगडी, (वार्ताहर) – प्राधिकरण सेक्‍टर क्रमांक 27 येथील विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर, माऊली उद्यान येथे बुधवार दि. 21 पासून ग्रंथश्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वरी पारायण व प्रवचन आयोजित केले आहे, अशी माहिती श्री विठ्ठल-रुक्‍मिणी प्रेरणा मंडळाने दिली. हा सोहळा 28 मार्चपर्यंत आहे.

मंडळाचे हे 13 वे वर्ष आहे. रोज सकाळी 8 ते 12 ह.भ.प. श्री. किसन महाराज चौधरी यांच्या अधिपत्याखाली पारायण होणार आहे. रोज सायंकाळी साडेपाच ते साडे सहा हरिपाठ आणि सायंकाळी सहा ते सात प्रवचन आहे. बुधवार दि. 21 मार्चला सुरेश आगाशे यांचे ज्ञानेश्‍वरीतील अध्याय 13 वर, गुरुवार दि. 22 मार्चला ह.भ.प. किसन महाराज चौधरी यांचे ज्ञानेश्‍वरीतील कर्मयोग, शुक्रवार दि. 23 आणि शनिवारी दि. 24 मार्चला जयश्री सांगवीकर यांचे ज्ञानेश्‍वरीतील पुरुषोत्तम योग, रविवार दि. 25 ला डॉ. ओजदा पोळ यांचे अवतार रहस्य, सोमवार दि. 26 मार्चला चंद्रशेखर निलाखे यांचे ज्ञानेश्‍वरीतील भक्‍तीयोग विषयावर प्रवचन व मंगळवार दि. 27 मार्चला सामूहिक गीताई पठण होईल.

कार्यक्रमाची वेळ सकाळी 8.30 ते 10.30 आहे. यशवंत लिमये आणि त्यांचे सहकारी हाक कार्यक्रम सादर करतील. दि. 27 मार्चला सायंकाळी 5 ते 7.30 किशोरी अमोणकर यांच्या शिष्या मधुवंती देव यांचा अवघा रंग हा भक्‍ती संगीताचा कार्यक्रम आहे. बुधवार दि. 28 मार्चला सकाळी 9.30 ते 12.15 ह.भ.प. नारायण महाराज आरडे व प्रविण सोळंके व इतकर यांचे काल्याचे कीर्तन व दुपारी 12.15 ते 2.30 मान्यवरांचे सत्कार, आरती आणि महाप्रसाद होईल.
पारायण प्रत नसल्यास पारायणास बसणारांना प्रत उपलब्ध करुन दिली जाईल.

पारायणासाठी शरद अवचट 8275682164, मधुसूदन मोकाशी 9850930902, विजयदत्त निमक 9850991293 व अनघा कोत्तुर 9922877841 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाने केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)