गौरी लंकेश हत्या प्रकरण : पुरवणी आरोपपत्रात सनातन संस्थेवर आरोप 

बंगळुरू: पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात येथील विशेष तपास पथकाने जे पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे त्यात त्यांनी सनातन संस्थेवरही आरोप ठेवला आहे. काल शुक्रवारी विशेष तपास पथकाने येथे न्यायालयात गौरी लंकेश हत्या प्रकरणात 9235 पानांचे आरोपपत्र ठेवले आहे.

त्यांनी म्हटले आहे की सनातन संस्थेच्या नेटवर्कने गौरी लंकेश यांना नियोजन पुर्वक लक्ष्य केले आहे. त्यात त्यांची व्यक्तीगत दुष्मनी नव्हती. तथापी धार्मिक विरोधामुळे गौरी लंकेश यांना त्यांनी लक्ष्य केले. त्यासाठी त्यांनी पाच वर्ष नियोजन केले होते असेही या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आधीचे आरोपपत्र गेल्या मे महिन्यात दाखल झाले असून आज त्यांनी या प्रकरणात पुरवणी आरोप पत्र दाखल केले.

-Ads-

तथापी या प्रकरणात आमचा तपास अजून बाकी आहे असे एसआयटीने कोर्टात नमूद केले. गौरी लंकेश हत्या प्रकरणात आत्तापर्यंत एकूण 18 जणांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. त्यात प्रत्यक्ष लंकेश यांची हत्या केल्याचा आरोप असलेला शुटर परशुराम वाघमारे, मास्टरमाईंड अमोल काळे, सुजितकुमार आणि अमित देगवेकर यांचा समावेश आहे. याच टोळीचा कलबुर्गी, पानसरे आणि दाभोलकर यांच्याही हत्येत हात असावा असा कयास आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)