गौरी लंकेश हत्या प्रकरणी आणखी एकास अटक

बेळगाव – गौरी लंकेश हत्येप्रकरणी कर्नाटकाच्या एसआयटीने बेळगावातील एका संशयिताला अटक केले असून, त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. महाद्वार रोडवरील संभाजी गल्ली येथील तो रहिवासी असून त्याच्या अटकेमुळे खळबळ उडाली आहे.

सध्या एसआयटीच्या ताब्यात असलेल्या व्यक्तीकडून या व्यक्तीचे नाव चौकशीत उघड झाले आहे. या व्यक्तीचे पुणे-बंगलोर महामार्गावर हॉटेल असून तेथे गौरी लंकेश प्रकरणातील संशयित जेवण करायला आणि चर्चा करायला जायचे. हॉटेल चालविणारा देखील हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित आहे. त्यामुळे काहीवेळा गौरी लंकेश प्रकरणातील व्यक्तींची राहण्याची सोय देखील त्याने केल्याचे समजते. गेल्या दोन दिवसापासून एसआयटी पथक त्याच्या मागावर होते. म्हणून त्याने स्वतःहूनच एसआयटी समोर शरणागती पत्करली.

-Ads-

खानापूर तालुक्‍यात देखील अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे रिसॉर्ट होते, पण काही महिन्यापूर्वी ते बंद झाले आहे. परशुराम वाघमारे याने नेमबाजीचे प्रशिक्षण खानापूर जंगलात घेतल्याचे आपल्या जबाबात यापूर्वीच सांगितले आहे. त्यामुळे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला घेऊन एसआयटी खानापूरला गेली होती. बेळगावजवळील एका गावातील आणखी एका परशुरामच्या शोधात एसआयटी आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)