गौरी लंकेश यांच्या हत्येत सनातन संस्थेचाच हात – एसआयटी 

बंगळूर – पत्रकार आणि कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटकच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) आज अतिरिक्त आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये सनातन संस्थेवर आरोप लावला आहे. कर्नाटकच्या सत्र न्यायालयात ९ हजार २३५ पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले. या आरोपपत्रापमध्ये म्हंटले की, सनातन संस्थेच्या एका नेटवर्कने गौरी यांना टार्गेट केले होते. गौरी लंकेश यांच्या हत्येचे जवळपास ५ वर्षांपासून नियोजन करण्यात आले होते.

विशेष सरकारी वकील एस. बालन यांनी सांगितले कि, गौरी आणि आरोपींमध्ये कोणतेही खाजगी शत्रुत्व नव्हते. केवळ एक विशेष विचारधारा असल्याने व त्याबद्दल लिहीत-बोलत असल्याने त्यांची हत्या करण्यात आली. एसआयटीने याप्रकरणी पुढे तपास करण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली आहे. गौरी लंकेश हत्येप्रकरणी एसआयटीने याआधी मे महिन्यात पहिले आरोपपत्र दाखल केले होते.

-Ads-

दरम्यान, गौरी यांची बंगळूरमध्ये मागील वर्षी ५ सप्टेंबरला हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी एसआयटीने आतापर्यंत शूटर परशुराम वाघमारे  आणि मास्टरमाइंड अमोल काळे, सुजीत कुमार उर्फ प्रवीण आणि अमित देगवेकरसह १८ लोकांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींचा नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि एम.एम.कलबुर्गी यांच्या हत्येतही सहभाग असल्याची शक्यता एसआयटीने वर्तवली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)