गौरी लंकेश यांची वाघमारेनेच केली हत्या

न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे शिक्कामोर्तब

बंगळूर – पत्रकार आणि कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्यावर परशुराम वाघमारे यानेच पिस्तुलमधून गोळ्या झाडल्याच्या बाबीवर गुजरातमधील न्यायवैद्यक प्रयोगशाळेने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे गौरी हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाला (एसआयटी) मोठेच बळ मिळाले आहे.

गौरी यांची बंगळूरमध्ये मागील वर्षी 5 सप्टेंबरला हत्या करण्यात आली. त्या हत्येशी संबंधित घटनाक्रमाचा एक व्हिडीओ तयार करण्यात आला. तो व्हिडीओ आणि हत्येच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले. दोन्ही व्हिझ्युअलमधील व्यक्ती एकच असल्याचे प्रयोगशाळेने स्पष्ट केले. त्यामुळे एसआयटीचा तपास योग्य दिशेने झाल्याच्या बाबीला पुष्टी मिळाली. गौरी हत्या प्रकरणी आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आली आहे. हत्या प्रकरणाशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध असल्याच्या संशयावरून एसआयटी आणखी काही जणांच्या मागावर आहे. ते संशयित महाराष्ट्र आणि गोव्याचे रहिवासी आहेत. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) त्यांचा शोथ सुरू केल्यावर ते फरार झाले आहेत, अशी माहिती एसआयटीच्या सुत्रांनी दिली.

गौरी यांच्या हत्येमागे एक निनावी टोळी आहे. त्या टोळीचा सूत्रधार अमोल काळे आहे. संबंधित टोळीने 26 विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या नावांचा समावेश असलेली हिटलिस्ट बनवली. त्यातील चौघांची म्हणजे गौरी, नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि एम.एम.कलबुर्गी यांची हत्या करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)