गौरी-गणपतीसाठी एस. टी. प्रशासन सज्ज

वल्लभनगर आगारातून जादा गाड्या : 9 सप्टेंबरपासून सुविधा

पिंपरी – गौरी-गणपती सणाला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटीच्या पिंपरी-चिंचवड आगारातर्फे या वर्षीही 58 जादा गाड्यांची सोय करण्यात येणार आहे. चिपळूण, रत्नागिरी, दापोली, खेड, रत्नागिरी, गुहागरसाठी 9 ते 12 सप्टेंबर दरम्यान जादा गाड्या वल्लभनगर आगारातून सोडल्या जाणार आहेत.

उद्योगनगरीच्या पिंपरी, काळेवाडी, आकुर्डी, निगडी, भोसरी भागात कोकणवासीयांची संख्या मोठी आहे. दर वर्षी गणपतीला ते आवर्जून गावी जातात. गणेशोत्सवास या वर्षी 13 सप्टेंबरपासून सुरवात होत आहे; तर गणपती प्रतिष्ठापना झाल्यानंतर तीन दिवसांनी गौरींचेही आगमन होत असते. त्यासाठी जादा गाड्या सोडण्याचे नियोजन एसटीच्या पिंपरी-चिंचवड आगारातून करण्यात आले आहे. आगारातून दरवर्षी 50 टक्के गाड्या या कोकण विभागासाठीच सोडल्या जातात. मात्र, गौरी-गणेशोत्सवात या गाड्या सुद्धा प्रवाशांना कमी पडतात. त्यामुळे यंदा सोडण्यात येणाऱ्या जादा गाड्यांची संख्या वाढवण्यात आली आहे.

वल्लभनगर आगारातून 9 सप्टेंबर रोजी 5 गाड्या, 10 सप्टेंबर रोजी 8, 11 सप्टेंबर रोजी 20 व 12 सप्टेंबर रोजी 25 जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. आरक्षणासाठी कोकणवासियांनी आत्तापासूनच गर्दी केली आहे. महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या संकेतस्थळावरुनही बुकींगला सुरूवात झाली आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून प्रसंगी गाड्यांची संख्या वाढवली जाईल. त्यासाठीची तयारी देखील आगाराने ठेवली असल्याची माहिती सहायक वाहतूक अधिक्षक पल्लवी पाटील यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)