गौरीशंकरच्या सुखात्मे स्कूलचा भारतीय रेलकडून गौरव

सातारा – केंद्र सरकारच्या स्वच्छता अभियान अंतर्गत राबवल्या गलेल्या स्वच्छता मोहिमेत गौरीशंकरच्या डॉ. पी. व्ही सुखात्मे स्कूल लिंबच्या विद्यार्थ्यानी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता या अंतर्गत विद्यार्थ्यानी संगम माहुली येथील रेल्वेस्टेशन परिसराची संपूर्ण स्वच्छता सामाजिक भावनेतून केली होती. या कार्याची विशेष दखल भारतीय रेल प्रशासनाने घेवून नुकताच या स्कूलला गौरव प्रमाणपत्रे सन्मानित करण्यात आले.

संगम माहुली रेल्वे स्टेशनचे रेल्वेप्रबधंक मनीराम मीना यांनी हे गौरव प्रमाणपत्र सुखात्मे स्कूलच्या प्राचार्या डॉ. नवनिता पटेल यांना देवून स्कूलचा उचित सन्मान केला. याप्रसंगी बोलताना रेल्वेप्रबधंक मनीराम मीना म्हणाले, स्वच्छता अभियानास सुखात्मे स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून एक राष्ट्रीय कार्य पार पाडले आहे सामाजिकतेची जाणीव ठेवून वाटचाल करणारे हे विद्यार्थी भविष्यात देशाचे नाव उज्वल करतील.

याप्रसंगी गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर म्हणाले सामजिक उपक्रमशीलता विद्यार्थ्यामध्ये नवी ऊर्जा निर्माण करते विद्यार्थ्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळेच गौरव प्रमाणपत्र प्राप्त झाले. भारतीय रेलकडून झालेल्या सन्मानाबदद्‌ल संस्थेचे चेअरमन मदनराव जगताप मिलिंद जगताप व संचालकमंडळ तसेच प्रशासकीय अधिकारी नितीन मुडलगीकर यांनी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)