गौरीशंकरचे महेंद्र काटकर “एकलन्स ऍवार्डने’ सन्मानित

सातारा – शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना मेक्काडेनिया एज्युकेशन इन्स्टिटयूट ऑफ युनायटेड अरब इमिरेटस ही संस्था दरवर्शी आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार देवून गौरविते. सन 2018 साठी गौरीशंकरच्या सनशाईन इंग्लिश मिडीयम स्कूल, खटाव येथे प्राचार्य म्हणून कार्यरत असलेले महेंद्र काटकर यांची या पुरस्कारसाठी निवड झाली. नुकताच हा पुरस्कार सोहळा दुबई येथे संपन्न झाला.

महेंद्र काटकर यांनी ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्याच्या उत्कर्षासाठी केलेल्या विशेष कामगिराची दखल घेवून हा गौरव करण्यात आला. पुरस्कार सोहळा दुबई येथील प्रसिध्द उद्योजक अब्दुल्ला अब्दुल रहिम मोहम्मद अबुदल्ला याच्या हस्ते देण्यात आला. पुरस्कार प्राप्त झाल्याबदल गौरीशंकर संस्थेचे चेअरमन प्रा. मदनराव जगताप, पुरोगामी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयसिंगराव देशमुख, नेताजी माने, सुभाष शितोळे, व्हा. चेअरमन मिलिंद जगताप व सर्व सचालंक मंडळ, प्रशासकिय अधिकारी नितीन मुडलगीकर, श्रीरंग काटेकर यानी अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)